Friday, April 26, 2024
घरमानिनीHealthPeriod Tracker: व्हॉट्सअॅपवर अशी ट्रॅक करता येईल पीरियड्सची तारीख

Period Tracker: व्हॉट्सअॅपवर अशी ट्रॅक करता येईल पीरियड्सची तारीख

Subscribe

जेव्हापासून महिलेला पीरियड्स येण्यास सुरुवात होते तेव्हापासून तिच्या शरिरात काही बदल होतात. यावेळी काही महिलांना फार समस्या येतात. पण आता पीरिड्स आल्यानंतर भीती बाळगली जात नाही. बदलत्या टेक्नोलॉजीच्या मदतीने आता पीरियड्सची तारीख तुम्हाला ट्रॅक करणे सोप्पे झाले आहे. तसेच तुमचा ओव्हल्युशन पीरियड्स, प्रेग्नेंसीसंदर्भातल अपडेट्स हे मोबाईलवर आता सहज मिळतात.

पीरियड्स कधी आले, कधी पर्यंत होते, मेंन्स्ट्रुअल ब्लड फ्लो कसा होता या सर्वांची माहिती पीरियड्स ट्रॅकरकडून दिली जाते. खरंतर पीरिड्स ट्रॅकर आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने आपल्या आरोग्यावर नजर ठेवतो. केवळ यासाठी युजर्सला पीरिड्स संदर्भातील सर्व माहिती द्यावी लागते. चॅटबॉटकडून याचा रेकॉर्ड ठेवला जातो. याच आधारावर पुढील पीरियड्स संदर्भातील रिमांड तुम्हाला पाठवले जाते.

- Advertisement -

भारतात सिरोना हाइजीन नावाच्या कंपनीने व्हॉट्सअॅपसोबत मिळून एक पीरियड ट्रॅकर तयार केले आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या मोबाईलवर पीरियड्सचे अपडेट हवे असतील तर पुढील स्टेप्स फॉलो करा-

- Advertisement -

-सर्वात प्रथम आपल्या फोनमध्ये 9718866644 हा क्रमांक सेव्ह करा
-आता व्हॉट्सअॅपवरुन या क्रमांकावर Hi असा मेसेज पाठवा
-चॅटबॉटकडून तु्म्हाला तेथे काही ऑप्शन्स दाखवले जातील
-चॅटबॉटमध्ये पीरियड्स ट्रॅकर असे लिहाल
-तुम्हाला तुमचे पीरियड्सची माहिती तेथे देण्यास सांगितले जाईल
-याआधी किती तारखेला पीरियड्स आले होते आणि पुढील पीरियड्सचा रेकॉर्ड चॅटबॉट ठेवेल
-वेळेआधी तुम्हाला पुढील पीरियड्सचे रिमाइंडर येईल
-तसेच कंसीव करण्याची योग्य वेळ काय हे सुद्धा सांगणार
-चॅटबॉट या संदर्भातील रिमाइंडर ही पाठवेल

पीरियड्सला आता सुद्धा समाजात टॅबू मानले जाते. घरात याबद्दल खुलेपणाने बोलले जात नाही. याचा परिणाम मुलींच्या आरोग्यावर कुठे ना कुठे तरी होतो. त्यामुळे पालकांनी आपल्या वयात आलेल्या मुलीला पीरियड्स बद्दलच्या काही गोष्टी जरुर सांगाव्यात. खासकरुन जेव्हा तिला पहिल्यांदा पीरियड्स येतात.


हेही वाचा- Sex and Diabetes- डायबिटीज आणि सेक्सचा आहे थेट संबंध

- Advertisment -

Manini