Tuesday, May 30, 2023
घर मानिनी Health Sex and Diabetes- डायबिटीज आणि सेक्सचा आहे थेट संबंध

Sex and Diabetes- डायबिटीज आणि सेक्सचा आहे थेट संबंध

Subscribe

मधुमेह झाल्याने रुग्णाला खाण्यापिण्याच्या बाबतीत पथ्य पाळावी लागतात. यामध्ये सर्वाधिक मोठा भाग सेक्शुअल हेल्थ सुद्धा आहे. अशातच जर तुमची ब्लड शुगर सामान्य असेल तर सेक्स दरम्यान तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

खरंतर मधुमेह झालेला व्यक्ती शरिरात निर्माण झालेल्या इंसुलिनचा पुरेपुर वापर करु शकत नाही. ज्यामुळे ब्लड शुगर वाढते. जर त्यावर उपचार केले नाहीत तर दीर्घकाळानंतर यामुळे मज्जातंतूंचे नुकसान, हृदय आणि लैंगिक आरोग्य समस्या होऊ शकतात.

- Advertisement -

तसेच महिलांना मधुमेह झाल्यास तर त्यांची कामुकता आणि प्लेजरचा आनंद घेण्याची क्षमता कमी होते. यामुळे त्यांना सेक्स करताना दुखत असल्यासारखे वाटत राहते. तर मधुमेह झालेल्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोनचा स्तर फार कमी असतो. त्यामुळे त्यांचे सेक्स ड्राइव कमी होते.

- Advertisement -

त्याचसोबत मज्जासंस्थेवर परिणाम झाल्याने काही पुरुषांना स्तंभन दोषाचा सामना करावा लागू शकतो.यावर तोडगा काढण्यासाठी तुम्ही एकच गोष्ट करु शकता. ती म्हणजे तुमची ब्लड शुगर नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करा.


हेही वाचा- C section डिलिव्हरी नंतरची लाईफ स्टाईल कशी असावी

- Advertisment -

Manini