Thursday, April 18, 2024
घरमानिनीHealthसेक्समुळे सौंदर्याबरोबर वाढतो आत्मविश्वास

सेक्समुळे सौंदर्याबरोबर वाढतो आत्मविश्वास

Subscribe

आपल्याकडे सेक्स या विषयावर जाहीरपणे बोलले जात नाही. त्यामुळे मानवी जीवनात महत्वाचे स्थान असलेल्या या प्रक्रीयेबद्दल अनेक गैरसमज आजही प्रचलित आहेत. यामुळे सेक्सवर बोलणाऱ्या व्यक्तीकडे विचित्र नजरेने पाहीले जाते. पण खरं तर शरिरशास्त्रानुसार शारिरीक सुख म्हणजे सेक्स हे फक्त शऱीरापुरतेच मर्यादित नसून त्याचा संबंध मनाशीही आहे.त्यामुळे सेक्सचा संबंध शरीर आणि मनावरही होतो आणि मन आनंदी असल्यावर त्याचे परिणाम शरीरावरही होताना दिसतात.परिणामी सेक्समुळे सौंदर्याबरोबरच व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यास हॅपी हार्मोन्सही तेवढेच कारणीभूत असतात.

जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार,ऑर्गेजममुळे शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढते,ज्यामुळे आपली त्वचा आणि केस निरोगी होतात. इस्ट्रोजेनमुळे त्वचा मॉइश्चराइज होते . ज्यामुळे त्वचा मऊ आणि गुळगुळीत राहते.

- Advertisement -

तर सेक्समुळे हृदयाची गती आणि रक्तप्रवाह वाढतो,त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाणही वाढते त्यामुळे चेहऱ्याची चमक वाढते.

ऑर्गेझम दरम्यान सेरोटोनिन आणि DHEA शरीरात स्रवले जातात. सेरोटोनिन एक न्यूरोट्रांसमीटर आहे, जो व्यक्तीला आनंदी आणि उत्साही ठेवतो. यामुळे तुमची प्रतिकारशक्तीही वाढते.

- Advertisement -

कामोत्तेजनामुळे शरीरात डोपामाइन आणि ऑक्सीटोसिन हे फील-गुड हार्मोन्स बाहेर पडतात. ऑक्सिटोसिन तुम्हाला आराम देते, ज्यामुळे तुम्हाला केवळ स्वतःबद्दलच नाही तर इतरांबद्दलही चांगले वाटते.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सेक्स आणि ध्यान यांचा मेंदूच्या एकाच भागावर परिणाम होतो. ध्यानाचा जो परिणाम आपल्या मनावर होतो तोच परिणाम सेक्समुळेही होतो. तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला आंतरिक शांतीचा अनुभव येतो.

- Advertisment -

Manini