Sunday, April 21, 2024
घरमानिनीHealthऊठसूट शॉपिंग, मानसिक आजाराचं लक्षण

ऊठसूट शॉपिंग, मानसिक आजाराचं लक्षण

Subscribe

आजच्या काळात मला शॉपिंग करणं आवडतं नाही असं सांगणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. कारण हल्ली लहानांपासून मोठयांपर्यंत सगळेच लहान सहान गोष्टींपासून महागड्या ब्रांडेड वस्तूंपर्यंत काहीना काही सतत खरेदी करत असतात.यात काहीजण दुकानात जाऊन खरेदी करणे पसंत करतात. तर काहीजण वेळेच्या अभावामुळे ऑनलाईन शॉपिंग करतात.शॉपिंगच्या या नादात अनेकदा काही वस्तूंची खरेदी ही गरजेनुसार करण्यात येते तर काहीवेळा गरज नसताना अनावश्यक गोष्टी विकत घेतल्या जातात .

- Advertisement -

नंतर गरज नसताना विकत घेतल्याचे लक्षात आल्यावर काहींना झालेली चूक कळते. पण काहींना त्याबद्दल काहीच वाटत नाही. उलट अजून काहीतरी विकत घ्यायला हवं असा विचार मनात येताच ते लगेच दुसरी अनावश्यक वस्तू विकत घेतात. जर तुमचं ही अनावश्यक वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण असचं वाढतं असेल तर वेळीच सावध व्हा. तर काहीजण टेन्शन घालवण्यासाठी खरेदी करतात. शॉपिंग केल्यानंतर त्यांना ताण कमी झाल्यासारखा वाटतो. हा देखील एक आजार आहे आणि त्याला कंपल्सिव बायिंग डिसऑर्डर (CBD) म्हणतात.

तुमच्या या सवयीचं व्यसनात कधी रुपांतर होईल हे तुम्हांलाही कळणार नाही.यामुळे वेळीच शाँपिंगच्या या सवयीला आळा घाला.कारण अनावश्यक खरेदी करणे हा एक प्रकारचा विकार आहे.त्यामुळे तुमची आर्थिक गणित बिघडू शकतात.पैसा वाया जाऊ शकतो. या संदर्भात आत्तापर्यंत अनेक संशोधने करण्यात आली आहेत, ज्यामध्ये हे समोर आले आहे की, काही काळासाठी तुम्हाला शॉपिंग केल्याने तुमचा तणाव कमी झाला आहे असे वाटत असले तरी दीर्घकाळात त्याचे अनेक नकारात्मक परिणामही होतात जसे – पैशाशी संबंधित समस्या, चिंता, नकारात्मक भावनांचे वर्चस्व आणि व्यक्ती कुटुंब आणि मित्रांपासून दूर जाणे.

- Advertisement -

ऑनलाइन शॉपिंगमुळे सीबीडीची ही समस्या आणखी वाढली आहे.ऑनलाइन शॉपिंगमुळे तुम्ही घरी बसून सर्व गोष्टी आरामात ऑर्डर करू शकता, त्यामुळे तुमच्या खरेदीची सवय वाईट व्यसनात किंवा ध्यासात कधी बदलते,कळत नाही.खरेदीचे व्यसन अद्याप अधिकृतपणे मानसिक विकार मानले गेले नसले तरी, हा एक प्रकारचा वेड-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (OCD) आहे. कंपल्सिव बायिंग डिसऑर्डरच्या लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे.

लक्षणे

अनावश्यक  खरेदीमुळे पैशांची कमतरता किंवा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

भरमसाठ खरेदीमुळे कामावर किंवा घरी मित्र किंवा कुटुंबासह समस्या.

प्रत्येक वेळी नवीन किंवा वेगळे काय खरेदी करायचे आहे ते शोधण्यात खूप जास्त आणि अनावश्यक वेळ घालवणे

अमेरिकन वेबसाईट webmd.com ने केलेल्या सर्वेक्षणानुसार,जर तुमच्या मनात कधी नकारात्मक भावना असतील आणि त्यावर मात करण्यासाठी तुम्ही खरेदी करायला सुरुवात केली तर याचा अर्थ तुम्हाला शॉपिंगचे व्यसन लागले आहे.

तुम्हीही दिवसभरात खरेदीचे नियोजन करत राहिल्यास, कोणत्याही महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुम्ही सतत काय खरेदी करायचे याचाच विचार करत असाल, कोणीतरी तुमच्याशी महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलत असेल पण तुमचं लक्ष मात्र खरेदीमध्ये असेल तर. मग ही सर्व चिन्हे सूचित करतात की तुम्हाला खरेदीचे व्यसन आहे.

आपण जे खरेदी करत आहात त्याची आपल्याला गरज नाही हे माहित असूनही, तरीही आपण स्वत: ला खरेदी करण्यापासून रोखू शकत नाही, तर हे देखील खरेदीच्या व्यसनाचे लक्षण आहे.

तुम्हाला परवडेल त्यापेक्षा जास्त खरेदी करणे, तुम्ही व्यवस्थापित करू शकता त्यापेक्षा जास्त कर्ज घेणे,इतरांकडून उधार घेऊन खरेदी – या सर्व गोष्टी कंपल्सिव बायिंग डिसऑर्डरची लक्षणे आहेत.

इतरांसाठी, खरेदी हा मजेदार अनुभव असू शकतो किंवा काहीतरी खरेदी करण्याची गरज असू शकते. पण जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांना काही शॉपिंग करेपर्यंत सामान्य वाटत नाही, तर हे नक्कीच शॉपिंग ॲडिक्शनचे लक्षण आहे.

- Advertisment -

Manini