Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealthपरफ्युम वापरण्याचे 'हे 'आहेत साईड इफेक्ट्स

परफ्युम वापरण्याचे ‘हे ‘आहेत साईड इफेक्ट्स

Subscribe

अंगावर,कपड्यांवर, परफ्युम शिंपडले की त्याच्या सुंगधानेच मूड फ्रेश होतो. वातावरण सकारात्मक होतं. यामुळे आपण दिवसभर मन प्रसन्न ठेवण्यासाठी ऑफिस, मिटींग्ज, सभारंभाला जाताना परफ्युम वापरतो. त्यासाठी पर्समध्ये परफ्युमही ठेवतो. पण तुम्हाला माहित आहे का की या परफ्युमचेही साईड इफेक्ट्स आहेत. ज्यामुळे काहीजणांना एलर्जी सारखे त्रास होऊ शकतात. तर काहींना थेट प्रकृतीविषयक गंभीर समस्याही उद्भवू शकतात.

- Advertisement -

परफ्युममध्ये प्रामुख्याने बेंजाईल अल्कोहोल, अॅसिटोन, इथेनॉल,एथिल एसीटेट, बेंजाल्डिाहईड, फार्मेल्डिहाईड, मेथॅनेल क्लोराईड बरोबरच लिमोनेन यासारख्या रसायनांचा वापर करण्यात येतो. या सुंगधी द्रव्यात फेथलेट्सचाही समावेश ्सतो. तसेच सगळ्याच सुंगधित परफ्युममध्ये एंडोक्राईन डिसपर्चर, कसिर्नोजेन बेंजोफेनोन आणि सायरिन या घातक केमिकल्सचाही वापर करण्यात येतो. या सर्व केमिकलयुक्त द्रव पदार्थांचा शरीरावर विपरित परिणाम होतो.

- Advertisement -

त्यामुळे बऱ्याचवेळा काहीजणांना परफ्युम लावल्याने त्रास होतो. यात प्रामुख्याने परफ्युमच्या सुंगधामुळे सुज येणे. गंभीर डोकेदुखी, यासह त्वचेच्या गंभीर समस्या निर्माण होतात.यात प्रामुख्याने त्वचेवर खाज येणे, भेगा पडणे असा त्रास होतो. तर काहीजणांना त्वचेवर पुरळ येऊन अस्वस्थ वाटू लागतं.

यामुळे परफ्युम वापरल्यानंतर जर तुम्हांला शिंका येत असतील, त्वचेवर जळजळ होत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर परफ्युमचा वापर तातडीने थांबवावा. तसेच गरज पडल्यास अलर्जी एक्सपर्टचा सल्ला घ्यावा. यामुळे पुढील अनर्थ टाळता येईल.

- Advertisment -

Manini