Thursday, April 18, 2024
घरमानिनीHealthसिंगल वुमन्सने अवश्य कराव्यात 'या' मेडिकल टेस्ट

सिंगल वुमन्सने अवश्य कराव्यात ‘या’ मेडिकल टेस्ट

Subscribe

ज्या स्त्रिया लग्न करीत नाही किंवा घटस्फोटामुळे एकट्या राहतात अशा महिलांनी निरोगी आरोग्यासाठी काही टेस्ट करणे गरजेचे असते कारण अशा महिलांमध्ये तणावाची पातळी अधिक असते. ज्यामुळे त्या आजारांना बळी पडू शकतात. हाय ब्लड प्रेशर, वजन वाढणे किंवा कमी होणे, हार्ट प्रोम्ब्लेम, कँसर यासारख्या गंभीर आजारांचा त्यांना धोका अधिक असतो. त्यामुळे एकल आयुष्य जगणाऱ्या महिलांनी आरोग्याची योग्य काळजी घेणं गरजेचे असते.

ओव्हेरियन सिस्ट टेस्ट –
तुम्हाला खालच्या ओटी पोटात दुखत असेल, अनियमित मासिक पाळी, मासिक पाळीत अति रक्तस्त्राव होणे या समस्या जाणवत असतील तर ओव्हेरियन सिस्ट टेस्ट करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

मॅमोग्राम –
कोणतीही बाह्य लक्षणे नसताना ही टेस्ट कॅन्सरचा शोध घेत असल्याने मॅमोग्राम टेस्ट महिलांसाठी आवश्यक आहे. क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन अर्थत CBE यात डॉक्टरांकडून ब्रेस्टची तपासणी केली जाते. यात ब्रेस्टमध्ये जाणवणारे बदल तपासले जातात. CBE वर्षातून एकदा आणि मॅमोग्राम 2 वर्षांतून एकदा करणे गरजेचे आहे.

कोलेस्ट्रॉल टेस्ट –
कोलेस्ट्रॉल हे फॅटी एसडीचा एक प्रकार आहे. तुम्हाला हार्ट प्रोम्ब्लेम आहे का नाही हे कळण्यासाठी ही टेस्ट केली जाते. ही टेस्ट महिलांनी 3 वर्षातून एकदा करणे आवश्यक आहे. जर कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असेल तर डॉक्टर तुम्हाला दर 6 ते 12 महिन्यांनी ही टेस्ट करण्याचा सल्ला देता.

- Advertisement -

ब्लड प्रेशर टेस्ट –
निरोगी आरोग्यासाठी ब्लड प्रेशर टेस्ट करणे गरजेचे असते. जर तुमचा रक्तदाब 90 ते 140 पेक्षा जास्त किंवा कमी असेल तर तुमच्या हृदयावर दबाव आहे, ज्यामुळे ब्रेन स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका किंवा किडनी निकामी होण्याचा धोका संभवतो.

बोन डेनसिटी टेस्ट –
बोन डेनसिटी टेस्टमध्ये मणके, मनगट आणि हिप्सच्या बोन्सची डेनसिटी विशिष्ट प्रकारच्या एक्सरेद्वारे मोजली जाते. ही टेस्ट ५ वर्षातून एकदा करावी.

पॅप स्मिअर टेस्ट –
गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी पॅप स्मिअर टेस्टद्वारे केली जाते. गर्भाशयाचा कर्करोगाचे निदान वेळेतच झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य आहे. ही टेस्ट 3 वर्षातून एकदा करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो. यामध्ये, योनीमध्ये इंस्ट्रुमेन्ट स्पेक्युलम टाकून गर्भाशयाच्या काही पेशींचे नमुने घेतले जातात. या पेशींमध्ये काही विकृती आहे का नाही हे पाहण्यासाठी तपासणी केली जाते.

 

 


हेही वाचा : Women Health : चाळीशीतही तरुण दिसायचंय? फाॅलो करा हे फिटनेस रुटीन!

- Advertisment -

Manini