Thursday, June 8, 2023
घर मानिनी Health Sports Bra खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

Sports Bra खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Subscribe

स्पोर्ट्स ब्रा केवळ आपल्याला कंम्फर्टेबलच नव्हे तर ब्रेस्टमध्ये ब्लड सर्कुलेशन सुद्धा ठिक ठेवते. या ब्रा मधून वर्कआउट दरम्यान निघाणार घाम शोषून घेतात. त्याचसोबत तुमच्या ब्रेस्टच्या येथील नसा सुद्धा घट्ट धरुन ठेवल्या जातात. अशातच जर तुम्ही चुकीच्या पद्धतीची स्पोर्ट्स ब्रा खरेदी केली तर तुमची ब्रेस्ट खाली गळल्यासारखी दिसते. ते दिसताना ही विचित्र वाटते. स्पोर्ट्स ब्रा खरंतर व्यायामादरम्यान होणारी समस्या दूर ठेवते. म्हणूनच तुम्ही उत्तम क्वालिटी, योग्य फिटिंग असणारी स्पोर्ट्स ब्रा खरेदी करावी. पण यावेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

-परफेक्ट फिटिंग

- Advertisement -


स्पोर्ट्स ब्रा ही नेहमीच परफेक्ट फिटिंग असणारी पाहिजे. ती खरेदी करताना तुम्ही तुमचे अंडरआर्म्स, शोल्डर स्ट्रॅपची त्वचा ही आवळली जाणार नाही याची काळजी घ्या. तसेच ब्रा घातल्यानंतर ब्रेस्ट सेंटरमध्ये असावी. तुमची स्पोर्ट्स ब्रा तुमच्या ब्रेस्टला सपोर्ट करतेय की नाही हे सुद्धा पहा.

-बॉडी पोस्चर

- Advertisement -


बॉडी पोस्चर योग्य नसेल तर तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच वर्कआउट पूर्वी योग्य ब्रा घालणे गरजेचे असते. अन्यथा हेवी वर्कआउटच्या कारणास्तव तुमच्या ब्रेस्टची साइज बिघडू शकते. ब्रेस्टला योग्य सपोर्ट मिळाल्यास पाठीचा कणा सुद्धा ताठ राहण्यास मदत होते.

-स्पोर्ट्स पॅडेड ब्रा


आजकाल मार्केटमध्ये विविध प्रकारच्या ब्रा उपलब्ध आहेत. त्यामुळे कळत नाही नक्की कोणती खरेदी करावी. जर तुम्ही हाय इंटेंसिटी वर्कआउट करत असाल तर अशी स्पोर्ट्स ब्रा खरेदी करा जी पॅडेड असेल. यामुळे ब्रेस्टला एक्स्ट्रा सपोर्ट मिळतो.

-योग्य साइज निवडा


जर तुम्ही योग्य साइजची स्पोर्ट्स ब्रा खरेदी केली तर वर्कआउटवेळी फायदा होईल. स्पोर्ट्स ब्रा खरेदी करण्यासाठी तुम्ही तुमच्या छातीच्या खालील भागाची साइज मोजा. त्यानुसार तुमचा बँन्ड साइज असला पाहिजे. त्यानंतर तुमची ब्रेस्ट साइज किती आहे ते मोजा. रिबकेज साइज आणि बस्ट साइज मधील अंतर तुम्हाला कप साइज ए, बी, सी ला डिफाइन करेल.

-तुमच्या वर्कआउट नुसार खरेदी करा


स्पोर्ट्स ब्रा खरेदी करतान तुम्ही कोणत्या पद्धतीचा वर्कआउट करणार आहात हे पहा. जसे की, योगा, कारडिओ. त्यानुसार तुम्ही स्पोर्ट्स ब्रा खरेदी करा. ही ब्रा खरेदी करताना त्यावर कोणत्या वर्कआउटसाठी ती आहे हे सुद्धा काहीवेळेस लिहिलेले असते.


हेही वाचा- Workout Tips : वर्कआऊट करताना गरगरत, चक्कर येतेय?.. मग वाचा

- Advertisment -

Manini