उन्हाळयाच्या दिवसात घामाने नकोसे होते, त्यामुळे घामाघूम करणारा व्यायाम करणे अनेक जण टाळतात. अशावेळी व्यायाम म्हणून अनेकजण स्विमिंगला जाण्याचा विचार करतात. स्विमिंग हा अनेकांसाठी आवडता खेळ असतोच पण यासोबत स्विमिंग हा उत्तम व्ययामप्रकारही आहे. स्विमिंगमुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. स्विमिंगमुळे सहनशक्ती आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते. शरीरातील चरबी घटविण्यासाठी तसेच इतरही अनेक गोष्टींसाठी यापेक्षा दुसरा चांगला व्यायाम प्रकार नाही.
स्विमिंग करण्याचे फायदे –
स्विमिंग डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीरावर कार्य करते. या एरोबिक एक्ससारसाईझमुळे शरीरावर ताण न येता हृदयाचे ठोके वाढतात. याव्यतिरिक्त, हे स्नायूंना टोन करते आणि सामर्थ्य आणि सहनशक्ती वाढविते.
स्विमिंग आपले हृदय आणि फुफ्फुसे मजबूत बनवून हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते. स्विमिंगमुळे मृत्यूचा धोका कमी होतो. एका संशोधनानुसार, जलतरणपटूंना मृत्यूचा धोका कमी असतो हे सिद्ध झाले आहे. स्विमिंगमुळे रक्तदाब कमी होण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते.
फुफ्फुसांसाठी स्विमिंग हा सर्वोत्तम व्यायाम आहे. ज्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. कोरोना, अस्थमा, टी. बी असे फुफ्फुसांचे आजार स्विमिंगमुळे दूर राहतात. जर तुम्हाला अस्थमा असेल स्विमिंग अवश्य करा. अस्थमा असणाऱ्यांसाठी स्विमिंग वरदान आहे. श्वसनाशी निगडित असलेला हा आजार श्वसनासाठी लागणारे नवे टिशू टायर करण्यास पोहणे मदत करते. स्विमिंगमुळे अस्थमा असणाऱ्यांचा त्रास कमी होतो.
तुमचा मूड चांगला करण्यासाठीही स्विमिंग करणे फायद्याचे ठरते. ज्यावेळी आपण पोहतो तेव्हा रक्तपुरवठा सुधारतो. मेंदूला रक्तपुरवठा पोहचल्यामुळे तुमचा मूड चांगला करण्यासाठीही मदत मिळते याशिवाय तुमची बुद्धी तल्लख करण्यासाठीही स्विमिंग अत्यंत फायदेशीर आहे.
तुम्हाला उत्तम रोगप्रतिकारशक्ती हवी असेल तर स्विमिंग अवश्य करा. कारण स्विमिंगमुळे अनेक व्याधी बऱ्या होतात. तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वाथ्य चांगले राहिल्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
तुम्ही ज्या दिवशी स्विमिंग करता त्यादिवशी तुम्हाला चांगली झोप लागते. खरं तर, पोहण्यामुळे तुमच्या सबंध शरीराचा चांगला व्यायाम होतो. शरीर थकले की, तुम्हाला आपसूकच छान झोप लागते. निद्रानाशेच्या समस्येने त्रस्त असाल तर अवश्य स्विमिंग करा.
तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर स्विमिंगचा पर्याय उत्तम असेल. स्विमिंग करताना संपूर्ण शरीराची हालचाल आपण करत असतो. त्यामुळे साहजिकच तुमच्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतो. ज्यावेळी आपण स्विमिंग करतो तेव्हा पाणी कापत पुढे जातो. असे करण्यासाठी शरीरात असलेली सगळी ऊर्जा वापरली जाते. अशाने शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करते.
हेही वाचा : पिरीएड्सदरम्यान स्विमिंग करायचंय, मग करा ही गोष्ट