Thursday, April 18, 2024
घरमानिनीHealthशरीरासाठी पाण्याइतकेच ऊनही गरजेचे

शरीरासाठी पाण्याइतकेच ऊनही गरजेचे

Subscribe

पाणी शरीरासाठी जितके महत्वाचे आहे. तितकचं सूर्यप्रकाशाने सुद्धा शरीराला अनेक फायदे होतात. पण अनेकांचा असा समज असतो की, सूर्यप्रकाशाने त्वचा काळी पडते. हे टाळण्यासाठी अनेकजण सूर्यप्रकाशात जात नाहीत. पण त्वचेसोबत शरीरही निरोगी राहणे मह्त्वाचे आहे. त्यासाठी अनेक तज्ञ हे सकाळी सूर्यप्रकाश घेण्याचा सल्ला देतात.

आपले शरीर हे व्हिटॅमिन ‘डी’ बनवण्यास सक्षम नाही. अनेक डाँक्टर्स यासाठी दररोज 20-30 मिनिटे सूर्यप्रकाश घेण्याची शिफारस करतात. सूर्यप्रकाशाने शरीराला अनेक फायदे होतात. याने केवळ शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यालाही फायदा मिळतो.

- Advertisement -

Does Sunlight Through Glass Provide Vitamin D? - The New York Times

स्ट्रेस कमी करण्यास होते मदत –
पहाटे अर्थात हलक्या सूर्यप्रकाशात शरीरातील मेलाटोनीन नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच स्ट्रेस लेवल कमी होण्यास मदत होते. यासाठी सूर्यस्नान हा एक उत्तम पर्याय ठरला आहे. यासाठी तुम्ही उन्हात फक्त चाललेच पाहिजे असं नाही. तर सकाळच्या उन्हात तुम्ही व्यायाम करू शकता. याने तुमचा स्ट्रेस कमी होण्यास मदत मिळते.

- Advertisement -

प्रतिकारशक्ती वाढविणे –
सूर्यप्रकाशामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे तुम्हाला अनेक रोगांपासून बचाव करण्यास संरक्षण मिळेल.

हाडे मजबूत होतात –
कँल्शियम शिवाय हाड मजबूत करण्यास व्हिटॅमिन ‘डी’ महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन ‘डी’ साठी उत्तम स्रोत आहे. जर तुम्ही फक्त 15 मिनिटे सूर्यप्रकाशात व्यायाम केल्यास तुमची हाडे मजबूत होतात. विशेषतः थंडीच्या दिवसात डॉक्टर्स सुद्धा सूर्यप्रकाशात राहण्याचा सल्ला देतात.

वजन नियंत्रणात राहण्यास उपयोगी –
सूर्यप्रकाश घेतल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. परिणामी वजन झपाट्याने कमी होते.

झोपेची गुणवर्ता सुधारते –
सकाळी १ तास सूर्यप्रकाश घेतल्याने रात्री चांगली झोप लागते. याचा अर्थ असा की,तुम्ही जेवढ्या जास्त सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहाल. तेवढं आपले शरीर झोपत असताना मेलाटोनीन तयार करेल. ज्याने चांगली झोप मिळेल.

 


हेही वाचा; किती मिनिटे वर्कआऊट करणे ठरते फायद्याचे?

- Advertisment -

Manini