Monday, January 20, 2025
HomeमानिनीHealthसूर्यनमस्काराने महिलांना होतात 'हे' फायदे

सूर्यनमस्काराने महिलांना होतात ‘हे’ फायदे

Subscribe

योग केल्याने शरीर निरोगी राहते. तुम्ही जर फिटनेसच्या बाबतीत वेडे असाल तर ‘योगा’ हा त्यासाठी उत्तम ऑप्शन आहे. काही सोप्पे आणि विशेष प्रकारचे योगा करून तुम्ही फिट राहू शकता. विशेष सांगायचे झाल्यास महिलांना याचे अधिक फायदे होतात. योग करताना शरीर ताणले जाते जे महिलांसाठी खूप फायद्याचे आहे. योगासनांपैकी सर्वात सोप्पा प्रकार म्हणजे ‘सूर्यनमस्कार’. सूर्यनमस्कार केल्याने महिलांची सांधेदुखीची समस्या कमी होते. याशिवायही सूर्यनमस्कार करणे महिलांसाठी अनेक प्रकारे फायद्याचे आहे.

मासिक पाळी नियमित होते –
बहुतेक महिलांना मासिक पाळीची संबंधित अनेक समस्या असतात. अशा वेळी तुम्ही दररोज सूर्यनमस्कार केलेत तर तुमच्या अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होऊ शकते. महिलांची मासिक पाळी देखील ग्रंथींच्या इंडोक्राइन सिस्टिमद्वारे नियंत्रित केली जाते. त्यामुळे तुमच्यावर सूर्यनमस्काराचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो.

ग्रंथी निरोगी राहतात –
जर महिलेने दररोज सूर्यनमस्कार केला तर महिलेच्या शरीरातील सर्व ग्रंथीची इंडोक्राइन सिस्टिम निरोगी रहाते. खरे तर, आपल्या शरीरातील सर्व कठीण कार्ये इंडोक्राइन सिस्टिमद्वारे प्रभावित होत असतात. योग्य प्रमाणात हार्मोन्स सोडण्यात मदत करण्यासोबतच, सूर्यनमस्कार शरीराच्या सर्व सिस्टिमला योग्यरीत्या कार्य करण्यास मदत करतो.

शरीर फ्लेक्सिबल बनते –
सूर्यनमस्कार केल्याने शरीर फ्लेक्सिबल राहते. घर आणि घरातील कामे करून महिलांना थकवा जाणवतो आणि याचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे तुमच्या दिनचर्येत नवीनता आणण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही सूर्यनमस्काराचा सराव करायला हवा. असे केल्याने शरीर फ्लेक्सिबल होण्यास मदत मिळेल.

 

 


हेही वाचा ; मेंटली स्ट्राँग होण्यासाठी करा ‘या’ गोष्टी

 

Manini