Friday, June 9, 2023
घर मानिनी Health Tabata Workout च्या मदतीने पटकन होईल वजन कमी

Tabata Workout च्या मदतीने पटकन होईल वजन कमी

Subscribe

खाण्यापिण्याच्या सवयी आणि दैनंदिन गोष्टींमुळे प्रत्येकाला आपण हेल्थी रहावे असे वाटते पण तसे होत नाही. त्यांना वजन वाढण्याच्या समस्येला सामोरे जावेच लागते. अशातच लोक जिममध्ये जाऊन घाम गाळतात आणि वजन कमी करतात. त्यासाठी डाएट ही केले जाते. सोशल मीडियात सध्या वजन कमी करण्यासाठी व्यायामाचे विविध प्रकार आपण पाहतो. ज्यामध्ये वर्कआउट ते योगाच्या माध्यमातून तुम्ही कसे तुमचे वजन कमी करु शकता हे सांगितले जाते. पण तुम्ही कधी टबाटा वर्कआउट केलाय का? सध्या याचा ट्रेंन्ड फार सुरु आहे. टबाटा वर्कआउट म्हणजे high-Intensity interval training असा त्याचा अर्थ होतो.

टबाटा वर्कआउट म्हणजे काय?
टबाटा वर्कआउट म्हणजे असा व्यायाम ज्याच्या माध्यमातून तुम्ही वेगाने वजन कमी तर करु शकता. पण त्याचसोबत तुमच्या बॉडीला शेप ही येतो. टबाटा वर्कआउट हे खरंतर हायइंटेन्सिटी वर्कआउट प्रमाणेच असते. यामध्ये तुमच्या हृदयाचे ठोके वाढले जातात. हा व्यायाम करताना तुम्ही कमी वेळात अधिक कॅलरजी बर्न करु शकता.

- Advertisement -

कसा कराल टबाटा वर्कआउट?
हा वर्कआउट केवळ 4 मिनिटात करायचा असतो. परंतु त्याचा रुल फॉलो करणे फार गरजेचे असते. हा वर्कआउट करण्यासाठी तुम्ही 20:10 च्या पॅटर्नला फॉलो करणे गरजेचे असते. ज्यामध्ये २० मिनिटांपर्यंत व्यायाम आणि नंतर 10 मिनिटे आराम करायचा असतो. असे याचे 8 राउंड पूर्ण करावे लागतात.

- Advertisement -

बिगिनर्सने कशी करावी सुरुवात?
बिगिनर्सला सुरुवातीला हा वर्कआउट करणे कठीण जाईल. अशातच त्यांनी कार्डिओ एक्सरसाइज करा. यावेळी तुम्ही टाइमर सुद्धा लावू शकता. 20 सेकंदापर्यंत न थांबता सातत्याने एक्सरसाइज केल्यानंतर १० सेकंदाचा ब्रेक घ्या. असे ४ मिनिटांपर्यंत तुमचा व्यायाम पूर्ण करा.

टबाटा वर्कआउटचा फायदा
टबाटा वर्कआउट तुम्हाला फिट ठेवतोच पण तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. याचा फायदा असा की, आजाराचा सामना करण्यास मदत होते.


हेही वाचा- Workout Tips : वर्कआऊट करताना गरगरत, चक्कर येतेय?.. मग वाचा

- Advertisment -

Manini