Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealthशेकहेंड आणि आरोग्य यांचा आहे थेट संबंध

शेकहेंड आणि आरोग्य यांचा आहे थेट संबंध

Subscribe

आपण अनेकदा अभिनंदन करण्यासाठी, भेटल्यावर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेकहेंड करतो. शेकहॅण्ड करणे म्हणजे सामान्यतः एक हावभाव मानण्यात येतो. पण तज्ज्ञांच्या मते, शेकहेंड आणि आरोग्य यांचा थेट संबंध आहे. एखाद्याच्या शेकहेंड वरून आपण त्याच्या आरोग्याची स्थिती जाणू शकतो. याशिवाय आरोग्याविषयी बऱ्याच गोष्टी या शेकहेंड वरून समजतात. जसे की, तुम्हाला हृदयविकाराचा धोका आहे का नाही ? स्मृतिभ्रंश किंवा नैराश्य आहे का?

हृदयाशी संबंधित समस्या – 
लंडन युनिव्हर्सिटीच्या मते, जर कोणी व्यक्ती हळूहळू हात मिळवत असेल तर भविष्यात त्याला हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचे लक्षण मानले जाऊ शकते. एका संशोधनात ५००० लोकांवर हा प्रयोग करण्यात आला. ज्यामध्ये असे आढळून आले की, ज्या हाताची पकड कमकुवत आहे, अशा लोकांचे हृदय कमकुवत आहे.

- Advertisement -

नैराश्य –
एका संशोधनानुसार, कमकुवत हाताची पकड असलेले लोक नैराश्याचे बळी असतात. वास्तविक, नैराश्याने ग्रासलेले लोक अनेकदा थकलेले आणि कमकुवत वाटतात. ज्यामुळे हातांची पकड कमकुवत वाटते.

स्मृतीभ्रंश आणि संधिवात –
जर एखाद्याची हाताची पकड कमकुवत असेल तर त्याची शारीरिक क्षमता कमकुवत होऊ शकते. परिणामी, स्मृतीभ्रंश आणि संधिवात कमकुवत शरीराचा ताबा घेतात.

- Advertisement -

मृत्यूचा धोका –
एका संशोधनानुसार ज्या लोकांच्या हाताची पकड कमकुवत आहे त्यांना लवकर मृत्यू येण्याचा धोका असतो. मध्यम वयात ज्या लोकांची पकड कमकुवत होते त्यांच्यामध्ये हृदय, श्वसनाचे आजार आणि कॅन्सरने मृत्यूचा धोका २० टक्क्यांनी वाढतो.

हायपरहायड्रोसिस –
डॉक्टरांच्या मते, जर एखाद्याला जास्त घाम येत असेल तर ‘हायपरहायड्रोसिस’ असे म्हणतात. हे शरीराच्या अनेक भागांना प्रभावित करते पण त्यातही तळव्यांना अधिक करते. हायपरहायड्रोसिस हे अतिक्रियाशील मज्जसंस्थेचे लक्षण असू शकते. जे नैराश्य, स्ट्रेस किंवा इतर काही मेडिकल समस्या दर्शवते.

 

 


हेही वाचा ; खुल्या हवेत धावण्याच्या तुलनेत ट्रेडमिलवर धावणे फायद्याचे ठरते?

 

- Advertisment -

Manini