Friday, April 19, 2024
घरमानिनीHealthBenefits Of Eating Fish : मासे खाण्याचे 'हे' आहेत फायदे

Benefits Of Eating Fish : मासे खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

Subscribe

भारतात नद्या, तलाव आणि समुद्राची कमतरता नाही, म्हणूनच ताज्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे या देशात मुबलक प्रमाणात आढळतात. बऱ्याच लोकांना मासे खाणे आवडते रमई, पापलेट, रावस , बांगडा, कोळंबी, चिंबोरी अशी नुसती नावे जरी ऐकली तरी मासेप्रेमींचे कान टवकारले जातात. रोजच्या जेवणात मासे मनापासून खाणारे करोडो लोक आहेत. जगभरात सीफूड लोकप्रीय आहे. पण, लोक केवळ आवड म्हणून मासे खातात पण त्याचे आपल्या आरोग्यासाठी भरमसाठ फायदे आहेत.

माशांमध्ये असतात ही पोषकत्तवे
आता माशांच्या सेवनामुळे तुम्हाला अनेक फायदे होतात हे कळल्यानंतर तुम्हाला माशांमध्ये नक्की असतं तरी काय असा प्रश्न पडला असेल तर माशांमध्ये असलेल्या पोषक घटकांविषयी माहिती असणेही आवश्यक आहे. माशांमध्ये लो फॅटचे प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते जे शरीरासाठी आवश्यक असते. माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन्स D आणि B2 असते. या शिवाय माशांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि झिंक, आर्यन, आयोडीन, मॅग्नेशिअम, आणि पोटॅशिअम यांचे योग्य प्रमाण असते.

- Advertisement -

मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर
माणसांचे वय वाढेल तसे मेंदूचे काम कमकुवत होऊ लागते. त्यामुळे वय जास्त झाल्यावर मेंदूची काम करण्याची क्रिया मंदावते. या आजारावर मासे खाण्याचा सल्ला दिला जातो. माशांच्या नियमित सेवनाने मानसिक आरोग्य सुधारण्यास तसेच अनेक गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते. रोज मासे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.

नैराश्यातून बाहेर काढतील मासे
नैराश्य ही एक मानसिक स्थिती असून ज्यात मूड बदलणे, शरीरातील शक्ती कमी होणे, सतत तणावाची स्थिती असणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. हृदयाशी संबंधित आजार आणि वजन वाढत असेल तर हे नैराश्याचे लक्षण आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जे लोक नियमितपणे मासे खातात त्यांच्यामध्ये नैराश्य खूप कमी आढळते. माशांमध्ये असलेले ओमेगा ३ फॅटी अॅसिड नैराश्यापासून मुक्त होण्यास मदत करते.

- Advertisement -

डोळ्यांसाठी फायदेशीर
ओमेगा -3 फॅटी ऍसिड दृष्टी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. संशोधनानुसार, ओमेगा-३ फॅटी अॅसिडच्या सेवनाने मेंदू आणि डोळ्यांना खूप फायदा होतो. माशांमध्ये या आम्लाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मासे दृष्टी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

त्वचा ठेवते तजेलदार
माशांमध्ये असलेले फिश ऑईल तुमच्या त्वचेसाठी चांगले असते. फिश ऑईलमध्ये व्हिटॅमिन E असते. शिवाय माशांमध्ये असलेले फॅटी अॅसिड तुमच्या त्वचेला आवश्यक असलेला तजेला देण्यास मदत करते. जर तुम्ही मासे खाणाऱ्यांची त्वचा पाहिली तर तुम्हाला त्यांच्या त्वचेवर एक वेगळीच चमक दिसेल. जी तुम्हालाही हवीहवीशी वाटेल.

मासे देतील सुंदर केस
चांगले केस हवे असतील तर तुम्हाला मासे खाणे फारच गरजेचे आहे. कारण माशांच्या सेवनामुळे तुम्हाला अपेक्षित असलेले केस मिळतात. केस लांब असण्यापेक्षा ते दाट असणे फारच गरजेचे असते. तुमचे केसही पातळ असतील तर तुम्ही माशांचे सेवन अगदी हमखास करायला हवे. माशांमध्ये मध्ये असलेले ओमेगा -3 आणि 6 हे केसांना दाट करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही माशांचे सेवन सुरु केल्यानंतर महिन्याभरात तुम्हाला हा बदल दिसू लागतो.

  • मासे खाण्याचे इतर फायदे
    मधुमेहाच्या रुग्णांनी चरबीयुक्त मासे खावे कारण यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढते आणि रक्तातील साखर टिकून राहण्यास मदत होते.
  • गरोदर महिला आणि त्यांच्या बाळाच्या आरोग्यासाठी मासे फायदेशीर ठरू शकते.
  • लहान वयातच जर तुमची हाडे कमकुवत होऊ लागली तर नियमित मासे खा कारण त्यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे आढळतात.
- Advertisment -

Manini