Wednesday, April 17, 2024
घरमानिनीHealthरात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुण्याने होतात 'हे' फायदे

रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुण्याने होतात ‘हे’ फायदे

Subscribe

घरातले काम असो किंवा ऑफिसचे या काही दिवसांत घरीच चालू असलेल्या कामाने खूप दबाव आणि थकायला होते. चांगले जेवण, थोडा व्यायाम,आणि चांगली झोप घेणं हे सध्याचा काळात थोड कठीण झाले आहे. तसे पहायला गेले तर यावर बरेच उपाय शोधून ठेवले आहेत. पण तरीही तुम्ही आम्हीही काही उपाय सुचवत आहोत. रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पायाचे तळवे स्वच्छ धुवून झोपा. तुम्हाला चांगली झोप येण्यास नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर पचनक्रिया होण्यास ही मदत होईल. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की, पचन क्रियेचे आणि आप्या आरोग्याच डायरेक्ट कनेक्शन आहे.

पाय धुणे का महत्वाचे?
झोपण्यापूर्वी पाय धुणे खूप गरजेचे आहे. पाय दिवसभर मोजे आणि शूजमध्ये असतात. त्यामुळे खूप घाम येतो आणि जंतू वाढू लागतात. विशेषतः जेव्हा आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो. पाय योग्य वेळी धुतले नाहीत तर बॅक्टेरिया वाढतात आणि पायाच्या अंगठ्याभोवती खाज आणि आर्द्रता निर्माण होऊ लागते. त्यामुळे त्वचेमध्ये समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत रात्री झोपण्यापूर्वी पाय धुणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून संसर्ग पसरू नये. हे केवळ बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाच्या संसर्गासाठीच नाही तर इतर प्रकारच्या संक्रमणांसाठी देखील आवश्यक आहे.

- Advertisement -

चांगली ऊर्जा मिळते
पायांना आराम झोपल्यानंतरच मिळतो. जितका वेळ काम करत राहाल तितका वेळ पाय जमिनीवर रहातील. त्यामुळे पायांना आराम मिळणे अवघड असते. त्यामुळे रात्री झोपताना पायांचे तळवे स्वच्छ धुतल्याने पायांना आराम पडतो. आणि शरीराला ही आराम मिळतो.

रात्री पाय धुवून झोपल्याने हे आरोग्यदायी फायदे
माणसाचा पाय हा एकमेव भाग आहे जो शरीराचे संपूर्ण भार स्वतःवर घेतो. त्यामुळे पायात जडपणा, पेटके आणि वेदना होतात. तुम्हालाही अशी समस्या असेल तर झोपण्यापूर्वी पाय धुवून झोपायला जा. असे केल्याने तुमच्या सांधेदुखी आणि स्नायूंना खूप आराम मिळेल.

- Advertisement -

आराम
व्यस्त जीवनशैलीमुळे दिवसभराच्या धावपळीमुळे पायांचे स्नायू आणि हाडे दुखू लागतात. पाय खूप दुखत असेल तर पाय धुवून झोपावे. यामुळे मन शांत राहण्यासोबतच शरीरही रिलॅक्स राहते. आयुर्वेदानुसार रात्री झोपण्यापूर्वी पाय धुणे चांगले मानले जाते. त्यामुळे चांगली झोप लागते आणि व्यक्ती तणावमुक्तही राहते.

मधुमेही रुग्णांनी पाय धुणे आवश्यक
मधुमेही रुग्णांमध्ये पायाच्या साहाय्याने संसर्ग पसरण्याचा धोका असतो. सतत चालत राहिल्याने पायाला जखमा होण्याची भीती असते ज्या लवकर भरून येत नाहीत. अशा स्थितीत पायावरील जखमा स्वच्छ करणे आवश्यक आहे. जेणेकरून पू भरणे किंवा पायांच्या ऊतींना नुकसान होण्याची शक्यता नसते.

पाय धुण्याचा हा योग्य मार्ग
आपण आपले पाय थंड, नॉर्मल किंवा कोमट पाण्याने देखील धुवू शकता. बादलीत पाणी घ्या आणि त्यात लिंबू देखील टाकू शकता. आता त्यात पाय थोडा वेळ ठेवा. 15 मिनिटे ठेवल्यानंतर, नंतर पाय बाहेर काढा आणि नंतर ते पूर्णपणे पुसून घ्या आणि त्यावर क्रीम किंवा तेल लावा, यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

- Advertisment -

Manini