Monday, April 15, 2024
घरमानिनीHealthहिवाळ्यात पेरू खाण्याचे 'हे' आहेत फायदे आणि तोटे, जाणून घ्या

हिवाळ्यात पेरू खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे आणि तोटे, जाणून घ्या

Subscribe

पेरू हिवाळ्यात सहज उपलब्ध होणारे हंगामी फळ आहे. पेरू खाण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. गरजेपेक्षा जास्त प्रमाणात पेरू खाल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. त्याच वेळी, काही आरोग्य स्थितींमध्ये पेरू खाणे हानिकारक मानले जाते. जाणून घेऊयात, हिवाळ्यात पेरूचा आहारात कसा समावेश करावा?

पेरू खाण्याचे फायदे –

- Advertisement -

Guava

  • पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे पेरू खाल्याने बद्धकोष्ठता दूर होते.
  • पेरू पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहे.
  • पेरूमध्ये दाहक गुणधर्म आढळतात. त्यामुळे पेरू खाल्याने शरीरातील जळजळ कमी होते.
  • पेरूमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे हिवाळ्यात पेरू खाल्याने प्रतिकारशक्ती मजबूत होते.
  • पेरू डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी चांगले आहे.
  • पेरूच्या सेवनाने ‘बीपी’ कंन्ट्रोलमध्ये राहते.

पेरू खाण्याचे तोटे –

- Advertisement -
  • पेरूमध्ये जास्त प्रमाणात ‘फायबर’ असतात. पण, जर पेरूचे तुम्ही अति सेवन केल्यास गॅस, अपचनचा त्रास जाणवू शकतो.
  • पेरूमध्ये ‘पोटॅशियम’चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ज्यांना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनी पेरू खाणे टाळावे.
  • तुम्ही दररोज कोणते औषध घेत असाल तर पेरूचे सेवन केल्याने औषधाच्या शोषणात व्यत्यय निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पेरू खाण्याआधी डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या.

तसे पाहता पेरू खाल्याने कोणतेही मोठे नुकसान होत नाही. तुम्ही पेरू कापून मीठ टाकून खाऊ शकता. तसेच सॅलड, ज्यूस च्या स्वरूपातही खाऊ शकता.

 

 


हेही वाचा ; वजन कमी करायचे ? मग या भाज्या ठरतील उपयोगी

 

- Advertisment -

Manini