कॅल्शियम हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत महत्वाचे असते. शरीरात जर कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली तर हाडे कमकुवत होण्याच्या धोका निर्माण होतो. परिणामी, थोडयाशा धक्क्याने सुद्धा हाडे फ्रॅक्चर होण्याचा शक्यता निर्माण होते. कॅल्शियम केवळ हाडांसाठी फायद्याचे नसते तर दातांचे आरोग्य राखण्यासही कॅल्शियम अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते. आज आपण असे काही पदार्थ पाहणार आहोत ज्याच्या सेवनाने हाडांमधून कॅल्शियम शोषले जाते. परिणामी, हाडे कमकुवत होऊ लागतात.
साखर –
जे लोक प्रमाणाच्या बाहेर गोड खातात, त्यांची हाडे कमजोर होण्याचा धोका निर्माण होतो कारण साखर हाडांमधील कॅल्शियम शोषून घेते. याशिवाय डायबिटीस सारख्या अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात.
अल्कोहोल –
अल्कोहोलचे सेवन हाडांना कमकुवत बनवितेच शिवाय हाडांची घनता सुद्धा नष्ट करते. ज्याचा परिणाम म्हणजे हाडे ठिसूळ होतात.
कोल्ड्रिंक्स –
कोल्ड्रिंक्स प्यायल्याने हाडांमधील कॅल्शियम नष्ट होत जाते. त्यामुळे असे पेय पिणे टाळायला हवे.
मीठ –
मीठाचे अतिसेवन संपूर्ण आरोग्यासाठी हानिकारकच असते. मिठाच्या अतिसेवनाने हाडे कमजोर होऊ लागतात.
चहा, कॉफी –
चहा, कॉफीचे सेवन म्हणजे हाडातली कॅल्शियम नष्ट करण्यास आमंत्रण. त्यामुळे चहा, कॉफीचे सेवन प्रमाणातच करा.
सोडियमचे आधिक्य असणारे पदार्थ –
सोडियमचे प्रमाण जास्त असलेले पदार्थामुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊ शकते. हे पदार्थ शरीरातील कॅल्शियम काढून टाकण्याचे प्रमाण वाढवू शकतात.
बटाटा, मशरूम, टोमॅटो –
व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होऊ शकते. म्हणून, व्हिटॅमिन डी ची कमतरता असलेल्या व्यक्तींना योग्य आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.
सीलबंद पदार्थ –
डबाबंद किंवा सीलबंद आणि पॅकेज अन्नपदार्थ खाणे टाळले पाहिजे. हे पदार्थही हाडांमधील कॅल्शियम शोषून घेतात.
हेही वाचा : कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उन्हाळ्यात करा ‘या’ फळांचे सेवन