Sunday, April 21, 2024
घरमानिनीHealth'या' पदार्थांमुळे होऊ शकतो पोटाचा कॅन्सर

‘या’ पदार्थांमुळे होऊ शकतो पोटाचा कॅन्सर

Subscribe

WHO च्या मते, पोटाचा कॅन्सर हा तिसरा नंबरवरचा सामान्य कॅन्सर आहे. गेल्या काही वर्षात विविध कारणांमुळे पोटाचा अर्थात गॅस्ट्रिक कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. गॅस्ट्रिक कॅन्सर तुमच्या पोटात कुठेही होऊ शकतो.पोटाच्या कॅन्सरमध्ये
ज्या ठिकाणी पोटाचा भाग अन्ननलिकेला जोडलेला असतो, त्या ठिकाणी पेशींची वाढ असामान्य होते. हा प्रकार युएसमधील गॅस्ट्रिक कॅन्सर झालेल्या अनेक रुग्णांमध्ये दिसून आला आहे. इतर देशांमध्ये गॅस्ट्रिक कॅन्सर सर्वसामान्य असून त्याच्या गाठी पोटाच्या मुख्य भागात तयार झाल्याचं दिसत.

सुमारे 95% रुग्णांमध्ये हा कॅन्सर पोटाच्या अस्तरात सुरु होतो आणि कालांतराने हळूहळू पसरतो. वेळेवर उपचार न केल्यास त्याचे रूपांतर ट्युमरमध्येही होऊ शकते आणि तो पोटाच्या खोलवर भागात वाढू शकतो. हा ट्युमर तुमच्या यकृत आणि स्वादुपिंडासारख्या जवळच्या अवयांमध्येही पसरू शकतो. नुकत्याच झालेल्या संशोधनातून असे समोर आले आहे की, पोटाचा कॅन्सर होण्यामागे काही पदार्थ कारणीभूत ठरतात.

- Advertisement -

ब्रेड आणि वाईन –
व्हाईट ब्रेड आणि अल्कोहोलचे सेवन हे पोटाच्या कॅन्सरचे प्रमुख कारण असल्याचे अनेक संशोधनातून आढळून आले आहे. म्हणजे व्हाईट ब्रेड आणि अल्कोहोलचे जास्त प्रमाणात सेवन करणाऱ्यांमध्ये पोटाचा कॅन्सर आढळून आला आहे. व्हाईट ब्रेड पिठापासून बनवला जातो. शिवाय यात कोणतेही पोषकततावे नसतात. त्याचप्रमाणे अल्कोहोलचे अतिसेवन पोटासह अनेक प्रकारच्या कॅन्सरची निगडित आहे.

- Advertisement -

पोटाच्या कॅन्सर टाळण्यासाठी ही पोषक तत्त्वे आवश्यक असतात –
फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉसफरस आणि मॅगनीज यासारख्या पोषकतत्वानी युक्त पदार्थांचे सेवन केल्याने पोटाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.

आहारात बदल करणे आवश्यक –
शास्त्रज्ञाचा असा दावा आहे की, पोटाच्या कॅन्सरच्या सुमारे 25 %प्रकरणे आहारात बदल करून कमी केला जाऊ शकतो.

या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे –
आहारातील बदल, निरोगी लाइफस्टाइल, वेळेवर तपासणी, फायबरचे सेवन वाढवणे आणि अल्कोहोलचे सेवन कमी करणे आदी गोष्टींद्वारे पोटाच्या कॅन्सर होण्याची शक्यता कमी केली जाऊ शकतो.

गॅस्ट्रिक कॅन्सरची लक्षणे –

गॅस्ट्रिक कॅन्सरची काही लक्षणे सुरुवातीच्या टप्य्यात दिसून येतात. त्यात कमी जेवण करूनही पोट भरल्यासारखं वाटणे, नाभीच्यावरील भागातील पोटात वारंवार दुखणे, जेवणानंतर गॅसेस झाल्यासारखं वाटणं, हार्टबर्न किंवा अपचन, वजन कमी होणे, शौचास काळ्या रंगाची होणे, रक्तची उलटी होणं, भूक कमी होणं, अन्न गिळताना त्रास होणं, थकवा किंवा अशक्तपणा, मळमळ, उलटी या लक्षणांचा समावेश आहे. यापैकी वजन कमी होणं आणि पोटदुखीसारखी लक्षणं सुरुवातीच्या टप्प्यात दिसत नाही. मात्र, यापैकी कोणतेही लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तर तातडीने तुम्ही डॉक्टराकडे तपासणी करणे आवश्यक आहे.

 

 

 


हेही वाचा : पॅरासिटेमॉल गोळ्या लिवरसाठी हानिकारक?

 

- Advertisment -

Manini