Friday, January 17, 2025
HomeमानिनीHealthब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करतात हे फूड

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करतात हे फूड

Subscribe

ब्रेस्ट कॅन्सरची वाढती प्रकरणे पाहता महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. ब्रेस्टचे आरोग्य राखण्यासाठी काही पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरू शकते. हे खास पदार्थ, ज्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतोय. अँटीऑक्सीडेंट्स आणि इतर विशेष पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन ब्रेस्टमध्ये कॅन्सरच्या पेशी तयार होण्यापासून प्रतिबंधित करतात, जेणेकरून कॅन्सरचा धोका निर्माण होत नाही.

हिरव्या पालेभाज्या – पालकासारख्या हिरव्या पालेभाज्या ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्यास मदत करतात. हिरव्या भाज्यांमध्ये पुरेशा प्रमाणात अँटीऑक्सीडेंट्स असतात, जे कॅन्सरशी कारणीभूत फ्री रॅडिकल्सचा प्रभाव नष्ट करतात. त्यामुळे महिलांनी आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश अवश्य करावा.

आंबटवर्गीय फळे – आंबटवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे ब्रेस्टच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. ज्या स्त्रिया पुरेशा प्रमाणात आंबटवर्गीय फळे खातात त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता 10 टक्क्यांनी कमी असते. आंबटवर्गीय फळे जेवणादरम्यान स्नॅक्स म्हणून खाल्ली जाऊ शकतात.

अळशीच्या बिया – अळशीच्या बियांमध्ये पुरेशा प्रमाणात ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतात, जे ब्रेस्टच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामध्ये इतर कोणत्याही अन्नापेक्षा जास्त लीगन्स असतात. हे एक वनस्पती कंपाउंड आहे ज्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सीडेंट्स,फायटोएक्सट्रोजेन असतात.

हळद – जळजळ टाळण्यासाठी हळद हा अत्यंत बेस्ट घटक मानला जातो. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे ऍक्टिव्ह कंपाउंड असते, जे ब्रेस्टच्या कॅन्सरचा प्रसार रोखण्यास आणि केमोथेरपीमुळे शरीराच्या इतर भागांवर होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते. यासाठी हळद तुम्ही सूप, कढी, भाजीपाला किंवा कोमट दुधात टाकून ते दूध पिऊ शकता.

बेरीज – ब्लूबेरी, स्ट्राबेरी, ब्लॅकबेरी आणि रास्पबेरीमध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारी कंपाउंड यासह अनेक विशेष पोषक घटक असतात. त्याचबरोबर त्याच्यात व्हिटॅमिन-सी सुद्धा असते. बेरीमध्ये अँटीऑक्सीडेंट्स असतात, जे आपल्या शरीराच्या पेशी खराब होऊ देत नाहीत.

आंबवलेले पदार्थ – आंबवलेल्या पदार्थामध्ये प्रोबायोटिक्स मुबलक प्रमाणात असतात, जे एक प्रकारचे निरोगी बॅक्टेरिया आणि यीस्ट आहेत. प्रोबायोटिक्स आपल्या पाचक आरोग्यासाठी खूप प्रभावी असतात. हे आपल्या शरीरास ब्रेस्ट कॅन्सर आजारास कारणीभूत असणारे विषारी पदार्थ शोषून घेण्यापासून रोखतात.

 

 

 

 


हेही वाचा : किडनीच्या रुग्णांनी चुकूनही या डाळी खाऊ नयेत

 

Manini