Monday, April 22, 2024
घरमानिनीHealthया पदार्थामुळे हाड होतील ठिसूळ

या पदार्थामुळे हाड होतील ठिसूळ

Subscribe

वाढत्या वयाबरोबर हाडे कमकुवत होणे सामान्य आहे. पण हाडे कमकुवत होण्याला सध्याची चुकीची लाइफस्टाइल, असंतुलित आहार ही कारणे सुद्धा जबाबदार ठरत आहेत. अशा परिस्थितीत संधिवात, फ्रॅक्चर आणि इतर अनेक प्रकारच्या हाडांशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो आहे. याशिवाय हांडाची ताकदही कमी होऊ लागते. अशावेळी तुम्ही पदार्थाबाबत जागरूक राहून हाडांशी संबंधित समस्या कमी करू शकता.

हाडे ठिसूळ करणारे पदार्थ –

- Advertisement -

सॉफ्ट ड्रिंक्स – एका अभ्यासानुसार, सॉफ्ट ड्रिंक्स केवळ वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येसाठी जबाबदार नाहीत, ते हाडे देखील ठिसूळ करू शकतात. सोडामध्ये फॉस्फरिक ऍसिड असते, जे आपल्या हाडांमधून कॅल्शियम बाहेर काढू शकते. त्याचवेळी, या पेयांमध्ये असलेले कॅफिन हाडांच्या घनतेवर परिणाम करू शकते. जर तुम्ही दिवसभरात भरपूर सॉफ्ट ड्रिंक्स पीत असाल तर ते आताच थांबवा आणि दूध, ज्यूस सारख्या हेल्दी ड्रिंक्सचे सेवन करा.

कॉफी – जर तुम्ही नियमितपणे कॉफी पीत असाल अर्थात दिवसातून 4 कप पेक्षा जास्त तर आताच सावध व्हा. सॉफ्ट ड्रिंकप्रमाणेच कॉफीमध्येसुद्धा कॅफिन असते, जे आपल्या कॅल्शियम शोषणावर परिणाम करू शकते.

- Advertisement -

मद्यपान – जास्त प्रमाणात मद्यपान हांडाच्या समस्येवर अधिक जोखमीचे ठरू शकते. एका रिसर्चनुसार, अल्कोहोल हाडांच्या घनतेवर परिणाम करू शकते. जे जास्त मद्यपान करतात ते पोटात कॅल्शिअम शोषून घेऊ शकत नाही. अल्कोहोल मिनरल्स, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी, के च्या शोषणावर देखील परिणामकारक ठरू शकते जे पॅनक्रियाज आणि हाडे तयार करतात. त्यामुळे अल्कोहोल टाळून हाडांसह संपूर्ण आरोग्य संतुलित राहते.

रेड मांस आणि प्रक्रिया केलेले मांस – हाडांच्या आरोग्यसाठी प्रोटीन्सचे सेवन महत्वाचे असते. हाडांसाठी योग्य प्रमाणात प्रोटिन्स घेणे महत्वाचे असले तरी त्याचे अतिसेवन करू नये. जास्त प्रमाणात रेड मांस किंवा प्रक्रिया केलेले मांस खाणे बऱ्याचदा हाडांच्या नुकसानीशी संबंधित असते.

व्हिटॅमिन ‘ए’ – व्हिटॅमिन ‘ए’ ची आपले संपूर्ण आरोग्य राखण्यास महत्वाची भूमिका असते. मात्र, त्याचे अति सेवन आरोग्यसाठी हानिकारक ठरू शकते. जसे की, हाडे कमकुवत होणे आणि हाडांची घनता कमी होणे.

 

 

 


हेही वाचा : फळे आणि भाज्या खा, हार्ट प्रॉब्लेम आणि कॅन्सर दूर ठेवा

 

- Advertisment -

Manini