Thursday, April 18, 2024
घरमानिनीHealthसाठीनंतरही फिट राहायचं मग आतापासूनच 'या' गोष्टी फॉलो करा

साठीनंतरही फिट राहायचं मग आतापासूनच ‘या’ गोष्टी फॉलो करा

Subscribe

काही लोक हे पन्नाशीच्या आतच थकून जातात. तर काही अंथरुणाला खिळून बसतात. अनेकांना तर 50- 55 च्या आसपासच अनेक गंभीर आजार घेरतात आणि अशा लोकांचे जगणे कठीण होऊन बसते. आपल्या आजूबाजूला अशी उदाहरणे तुम्ही पाहिली असतील. तुम्हालाही जर या सर्व समस्या पुढे जाऊन टाळायच्या असतील, तर तज्ज्ञांनी सांगितलेल्या पुढील गोष्टी अवश्य फॉलो करा. या गोष्टी तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात फॉलो केल्यास तुम्ही साठीनंतर निरोगी आणि तंदुरुस्त राहाल.

वेळोवेळी आरोग्य तपासणी करा – वेळोवेळी आरोग्य तपासणी करा. अशाने भविष्यात उदभवणाऱ्या समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. याचे दुसरे कारण म्हणजे काही आजार हे गुप्तपणे होतात आणि कालांतराने भयावह रूप घेतात. त्यामुळे तुम्ही जर वेळोवेळी आरोग्य तपासणी केलीत तर वेळेतच आजाराचे निदान होईल. ज्याने वेळेत उपचार करता येतील.

- Advertisement -

नियमित व्यायाम करा – वय झाल्यानंतरही व्यायामाने तंदुरुस्त राहता येते. पण तुम्ही जर योग्य वयातच व्यायामाला सुरुवात केल्यास तुम्ही आधीपासूनच फिट राहाल. अशाने डायबिटिससारख्या आजारांचा धोका कमी होतो शिवाय ह्रदय निरोगी रहाते.

- Advertisement -

संतुलित आहार घ्या – संतुलित आहार घेतल्याने शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. त्यामुळे कॅल्शियम आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात तर फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. वय झाल्यावर हाडे कमकुवत होतात अशावेळी संतुलित आहार घेणे फायद्याचे आहे.

पुरेशी झोप घ्या – फिट राहण्यासाठी पुरेशी झोप घ्या. ज्या लोकांना रात्री झोप लागत नाही अशा लोकांना मानसिक आणि शारीरिक समस्या भरपूर प्रमाणात जाणवतात. त्यामुळे पूर्ण झोप घेण्याचा प्रयन्त करा.

नियमितपणे औषध घ्या – जर तुम्हाला कोणता आजार असेल तर नियमितपणे औषध घ्या. अशाने समस्या वृद्धपकाळात अडचणीची ठरणार नाही.

स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयन्त करा – जस जसे वय वाढू लागते तसतशी स्मरणशक्ती कमी होऊ लागते. याला प्रामुख्याने स्ट्रेस आणि टेन्शन जबाबदार असते. त्यामुळे शक्यतो स्ट्रेस फ्री जगण्याचा प्रयन्त करा. यासाठी तुम्ही ध्यान किंवा मेडिटेशन करू शकता.

 

 


हेही वाचा ; टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणे आरोग्यासाठी धोकादायक

 

- Advertisment -

Manini