Saturday, September 30, 2023
घर मानिनी Health 'या' ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये असतात घातक केमिकल,होऊ शकतो कॅन्सर

‘या’ ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये असतात घातक केमिकल,होऊ शकतो कॅन्सर

Subscribe

मेकअप करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बऱ्याच कॉस्मेटीक्समध्ये विविध प्रकारचे केमिकल वापरण्यात येतात. या केमिकलमुळे त्वचा विकाराबरोबरच गंभीर आजार होण्याचाही धोका वाढतो. यामुळे हे टाळण्यासाठी कोणते ब्युटी प्रोडक्ट वापरू नयेत हे माहित असणे गरजेचे आहे.

आजच्या काळात प्रेझेंटेबल दिसणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे महिलाच नाही तर आता पुरुषही विविध कॉस्मेटीकचा वापर करू लागले आहेत. यामुळे कॉस्मेटीकच्या क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे. यामुळे कंपन्या रोज नवीन नवीन प्रॉडक्ट बाजारात आणत आहेत.

- Advertisement -

यात प्रामुख्याने ब्युटी प्रॉडक्ट जास्तीत जास्त वेळ तुमच्या त्वचेवर, ओठांवर, डोळ्यात, पापण्यांवर, केसांवर कसे टिकतील (लॉंग लास्टीक ) असे प्रॉड्क्ट बनवण्याचा सपाटाच कंपन्यांनी लावला आहे. जास्त वेळ चेहऱ्यावर मेकअप राहावा यासाठी महिला, पुरुषही लॉंग लास्टीक प्रॉडक्ट खरेदी करत आहेत.

- Advertisement -

पण हे प्रॉडक्ट विकत घेताना ते लॉंग लास्टींग आहे का हेच बघितले जात आहेत. त्यात वापरण्यात आलेल्या केमिकल आणि इतर गोष्टी मात्र तपासल्या जात नाहीत. यामुळे आपण वापरत असलेल्या ब्युटी प्रॉडक्टमध्ये कोणते केमिकल वापरले जाते ते किती हानिकारक आहे हेच आपल्याला माहित नसते. त्यामुळे भविष्यात त्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात हे बऱ्याचजणींना माहितच नसते. यामुळे काही ठराविक ब्युटी प्रॉडक्ट विकत घेताना खबरदारी घेण्याचा सल्ला तज्त्रमंडळी देतात.

वॉटरप्रूफ मस्कारा (Waterproof mascara)

 

पावसाळ्यात मेकअप टिकून राहावा यासाठी कंपन्या वॉटरप्रूफ ब्युटी प्रॉडक्ट बाजारात आणतात. त्यात मेकअपमध्ये महत्वाचा असलेला मस्काराही असतो. पण हा वॉटरप्रूफ मस्कारा तयार करताना त्यात अनेक केमिकल वापरले जाते.जसे की पर एंड पॉली फ्लोरो अल्काईल हे सब्स्टेंसेस (PFAS)मस्कारामध्ये वापरले जातात. यात पेरफ्लूराएल्काईनचा वापर केला जातो. त्यामुळे पावसाळ्यात किंवा दमट वातावरणातही मस्कारा पापण्यांना चिकटून राहतो. PFAS हे अतिधोकादायक केमिकल असून किडनी विकार, हाय कॉलेस्ट्रॉल, इनफर्टीलिटी आणि मेंदू विकार यामुळे होऊ शकतात. तसेच याच्यावापरामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवक होतेच. डायबिटीस, स्थूलतेबरोबरच कॅन्सरचा धोकाही वाढतो.

हेयर स्ट्रेटनिंगसाठी वापरण्यात येणारे केमिकल ( hair straightening)

केस नीटनेटके दिसण्यासाठी ब्युटी पार्लर आणि सलून, स्पामध्ये केसांना विशिष्ट केमिकल लावले जाते. या केमिकलमध्ये घातक घटक असतात. जे गर्भाशय आणि ब्रेस्ट कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकतात. हेयर स्ट्रेटनिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या या केमिकल्समध्ये पॅरोबेंस, बिस्फेनॉल, ए आणि फॉर्मल्डिहाईडसारखे धोकादायक घटक असतात. जे सरळ केसांच्या मूळातून डोक्याच्या त्वचेतून शरीरात प्रवेश करतात.

ड्राय शॅम्पू

केस सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी ड्राय शॅम्पूचा वापर केला जातो. पण ड्राय शॅम्पूमध्ये बेंन्झीन नावाच्या शरीरासाठी हानिकारक असलेल्या केमिकलचा वापर करण्यात येतो. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. बेंझीनचा वापर अधिक काळ केला तर शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी होऊ लागते. त्यामुळे ल्युकेमिया होऊ शकतो. बेंन्झीन जर हवेत स्प्रे केले तर हवेतून श्वासाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करते.

- Advertisment -

Manini