नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते ६ महिन्याच्या बाळापर्यंत लहान मुलं बेडवरच पहुडलेली असतात. पडल्या पडल्या ती आपले हातपाय चालवत असतात. मध्येच कुशीवर वळून ते पोटावर झोपतात आणि मान वर करून खेळत असतात. लहान बाळाच्या या लिलया आपल्याला हरखून टाकतात. त्याचं हातपाय चालवणं, कुशीवर वळणं पाठीवर उताणं झोपणं मध्येच कुशीवर वळता वळता पोटावर झोपणं या त्याच्या अॅक्टीव्हिटीज असतात. पण तुम्हांला वाचून आश्चर्य वाटेल की बाळाच्या त्या पोटावर झोपण्याला टमी टाईम म्हणतात. हे टमी टाईम त्याच्या शारिरीक विकासात महत्वाची भूमिका निभावते. यामुळे बाळाच्या खाण्यापिण्याच्या झोपण्याच्या टाईमटेबलप्रमाणेच त्याच्या टमी टाईमचेही टाईम टेबल करण्याचा सल्ला तज्त्र देतात.
ज्यावेळी बाळ जागे असते तेव्हा ते बऱ्याचवेळा हातपाय चालवता चालवता कुशीवर वळते आणि दुसऱ्याच क्षणाला पोटावर झोपते. त्याच्या या टमी टायमर पोजीशनमधील झोपेमुळे त्याचा शारिरीक विकास वेगाने होतो. बुद्धीचा विकास होतो. पोटावर झोपल्याने मान, खांदे आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात.त्यामुळे बाळ वेळेच्या आधीच स्व:तच उठून बसते. रांगू लागते.
बाळ जन्माला आल्याच्या तिसऱ्या चौथ्या दिवसांपासूनच टमी टाईम सुरू करते.अशावेळी बाळाला ३ ते ४ मिनिटांसाठीच पोटावर झोपवावे.
टमी टाईमसाठी बाळाला बेडवर उलटे न झोपवता जमिनीवर झोपवावे.
ज्यावेळी बाळ जागी असेल खेळण्याच्या मूडमध्ये असेल तेव्हाच त्याला पोटावर उलटे झोपवावे. त्याच्याशी बोलावे.
ज्यावेळी बाळ टमी टाईम सेशन करत असेल तेव्हा शक्यतो त्याच्यासमोर जाऊन बसावे आणि गप्पा माराव्यात.
मात्र जर बाळाचे पोट बिघडले असेल त्याला जेवण जात नसेल तेव्हा टमी टाईम करु नये.