Saturday, April 20, 2024
घरमानिनीHealthJackfruit Benefits : गरे खा गरे, आरोग्याला बरे!, फणसाचे अनोखे फायदे

Jackfruit Benefits : गरे खा गरे, आरोग्याला बरे!, फणसाचे अनोखे फायदे

Subscribe

फणस म्हटला की काटेरी आणि मोठं फळ मात्र रसाळ गरे आपल्या डोळ्यासमोर आपसूकच चित्र उभं राहतं. फणसाची भाजी असो, कापा अथवा बरका फणस असो कोकणातील माणसाला फणस म्हणजे काय हे वेगळं सांगायची गरजच नाही.
फणसांच्या गऱ्यामध्ये शाकाहारी खाणाऱ्या व्यक्तींना प्रोटीनसाठी आहारात फणसाचा समावेश करून घेणे नेहमीच फायद्याचे ठरते. फणसाचे फायदे आणि त्याचे औषधीय गुण कशा प्रकारे शरीराला लाभदायक ठरतात. तर यामध्ये फणस खाण्याचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या.

फणसाचे फायदे

फणस आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचे गुणधर्म आणि त्यात असलेले पोषण हे त्याला खास बनवते. तसेच, फणस हा कोणत्याही गंभीर आजारावर अजिबात इलाज नाही. हे फक्त त्या आजराची लक्षणे कमी करू शकते.

- Advertisement -

शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यापासून रोखते

कॅन्सरसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फणस (जॅकफ्रूट) हा रामबाण उपाय ठरू शकतो. लिग्नांस, आयसोफ्लाव्होन आणि सॅपोनिन्स सारख्या फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध, फणसामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात, जे शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यास प्रतिबंध करतात. डायटरी फायबर असल्याने, फणस कोलन आणि पोटाचा कर्करोग प्रतिबंधित करते.

हृदयासाठी फायदेशीर

हृदय निरोगी ठेवण्यासाठीही फणसाचे सेवन केले जाऊ शकते. जॅकफ्रूटमध्ये असलेले व्हिटॅमिन बी6 रक्तातील होमोसिस्टीनची पातळी कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. दुसरीकडे, फणस पोटॅशियमच्या प्रमाणामुळे रक्तदाब कमी करून हृदयविकाराचा झटका देखील प्रतिबंधित करते.

- Advertisement -

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी देखील फणसाचे सेवन फायदेशीर आहे. फणस खाल्ल्याने अँटिऑक्सिडेंट क्षमता आणि लॅक्टिक अॅसिड वाढते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. जॅकफ्रूटमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ओळखले जातात.

डोळ्यांसाठी फायदेशीर

फणसामध्ये विटामिन ए आणि सी दोन्ही तत्वे भरपूर प्रमाणात असातात आणि डोळ्यांसाठी ही दोन्ही पोषक तत्वे फायदेशीर ठरतात. एका शोधात दिल्यानुसार विटामिन सी चे योग्य प्रमाण मिळत राहिले तर डोळ्यांसंबंधित आजार दूर पळतात. तसंच डोळ्यांच्या आजाराची जोखीम तुम्हाला नक्कीच स्वीकारावी लागत नाही. फणसाचे फायदे जेव्हा तुम्ही विचारात घेता तेव्हा डोळ्यांसाठीही याचा फायदा होताना दिसतो.

थायरॉईड

ज्या व्यक्तीला थायरॉईड आहे त्यांनी फणसाचे सेवन नक्की करावे. फणसामध्ये कॉपरचे प्रमाण असते, जे थायरॉईड मेटाबॉलिज्म राखण्यास मदत करते. त्याशिवाय कॉपर थायरॉईडच्या आजारावरही फायदेशीर ठरते. एका शोधानुसार, हायपोथायरॉईज्मच्या रोग्यांसाठी विटामिन सी अत्यंत महत्त्वपूर्ण पोषक तत्व आहे. त्यामुळे थायरॉईड असल्यास फणस खाण्याचा उपयोग होतो. थायरॉईड ग्रंथी यामुळे थायरॉईड हार्मोनचे उत्पादन करत नाहीत.

फणसाचे तोटे

फणसाचे फायदे आणि तोटे दोन्ही असू शकतात. आत्तापर्यंत तुम्ही फणसाचे फायदे जाणून घेतले, आता फणसाचे तोटे जाणून घ्या…

  • पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
  • ओरल ऍलर्जी देखील एक समस्या होऊ शकते.
  • मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ग्लुकोजची पातळी बिघडू शकते.
- Advertisment -

Manini