Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health बोटात अंगठी घट बसलीय, मग होईल हा त्रास

बोटात अंगठी घट बसलीय, मग होईल हा त्रास

Subscribe

जेव्हा लोक हाताच्या बोटात घट अंगठी (Tight ring) घालतात. कधी कधी ही अंगठी बोटामध्ये अडकून राहते आणि जुन्या अठवणींमुळे तुम्ही अंगठी हातातून काढत नाहीत. पण, असे करणे हे हानीकारक ठरू शकते. घट अंगठीमुळे बोटांच्या नसा जाम होतात. याचा परिणाम तुमच्या शरीरावर पडतो. त्या व्यतिरिक्त हे संक्रमण होण्याचे देखील एक कारण होऊ शकते. हे संक्रमण आपल्या हाड्डांपर्यंत पसरू शकते. काही वेळा तर हाताची बोटे कापण्याची देखील वेळ येऊ शकते.

जर्नल ऑफ हॅंड सर्जरीमध्ये पब्लिश झालेल्या का रिपोर्टनुसार, घट अंगठी घातल्याने एम्बेडेड रिंग सिंड्रोमचे (embedded ring syndrome) धोका होतो. यामुळे तुमच्या हाताच्या बोटांना संक्रमण होण्याचा जास्त धोका असतो. जे हळूहळू तुमच्या हाडे आणि शरीरातील दुसऱ्या भागात पसरू शकतो. हे खूप क्वचित होते, पण अंगठी घातल्याने असा धोका उद्भवू  शकतो.

- Advertisement -

नस दबण्याची शक्यता

आपले शरीर हे नसामुळे काम करते, शरीरच्या कोणत्याही भागात नस दबल्यास दुसरा भाग देखील प्रभावित होतो. तसेच एक्यूप्रेशर थेरेपी ही असेच काम करते, असे फिजीशियन डॉ. विशाल कुमार यांनी सांगितले. दरम्यान, अंगठ्यांमुळे नसवर दबाव पडल्यामुळे शरीराच्या दुसऱ्या भाग देखील प्रभावित होऊ शकतो. यामुळे घट अंगठी नसावी जेणे करून तुमच्या नसावर दबाव येईल, असेही डॉ. विशाल कुमार यांनी सांगितले.

क्रॉनिक कॉन्सट्रिक्शनमुळे बोटे कापण्याची वेळ येऊ शकते

- Advertisement -

जर तुम्ही जास्त काळ घट अंगठी खूप घालत असाल, तर बोटात फसलेली अंगठी बोटांच्या टिश्यूजला नुकसान होते. काळांतराने ते क्रॉनिक कॉन्सट्रिक्शन (chronic constriction) होऊ शकते. या परिस्थितीत अंगठीमध्ये टिश्यूज आणि हाडांना एवढे नुकसान झालेले असते की, हे संक्रमण वाढू नये, म्हणून बोट कापले देखील जाऊ शकते.

 

लहान मुलांना अंगठी घालू नये

मुलांना अंगठी घातल्याने बोटाला वाकडी होऊ शकतात. मुलांचे शरीर सतत विकसित होते. त्यांच्या बोटांचा आकारही सतत बदलत राहतो. अशा परिस्थितीत त्यांना अंगठी घालणे हानिकारक ठरू शकते. कारण कधीकधी अंगठी बोटांचा नैसर्गिक विकास थांबवते. त्यामुळे बोटे कायमची वाकडी होतात.

बोटात सैल अंगठी घालावी

ब्यूटीशियन प्रीती परमार यांनी सांगितले की, फॅशनसाठी घातलेली अंगठी ही सतत बदलत रहावे. यामुळे अंगठी फसण्याचा धोका नसतो. तसेच दिवसातून एक दिवस बिना अंगठीशिवय राहू शकता. यामुळे बोटांच्या टिश्यूला आराम मिळतो. त्यावेळी हाताच्या बोटांना खोबरेल तेल लावावे.


 

हेही वाचा – जेवणानंतर गोड खायची सवय चांगली की वाईट?

- Advertisment -

Manini