Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health खाल्ल्यानंतर ब्रश केल्यानेही वजन होते कमी

खाल्ल्यानंतर ब्रश केल्यानेही वजन होते कमी

Subscribe

वजन कमी करण्यासाठी आपण काही प्रकारे प्रयत्न करतो. ज्यामध्ये जिमला जाणे, वर्कआउट आणि डाएटला सर्वाधिक महत्व दिले जाते. परंतु तुम्हाला माहितेय का, ब्रश केल्याने सुद्धा तुमचे वजन कमी होऊ शकते. तुम्हाला हे वाचून थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे. तुमची ही चांगली सवय तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करु शकते. आपल्या दातांना ब्रश केल्याने तुम्ही किती स्वच्छ, हेल्दी राहता त्यापेक्षा ही अधिक फायदा मिळतो. खरंतर खाल्ल्यानंतर ब्रश केल्याने कॅलरी काउंट कमी केला जाऊ शकतो आणि त्याचसोबत क्रेविंसपासून ही सुटका होते, तर पाहूयात ब्रश केल्याने वजन नक्की कसे कमी होते त्याचबद्दल अधिक. (Weight and brushing connection)

वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण स्किप करण्याची काहीच गरज नाही. उलट 150-200 कॅलरी पर्यंत डिनर करु शकता. डिनरमध्ये अधिक प्रोटीन युक्त पदार्थ असल्यास स्नायू आणि मेटाबॉलिज्म उत्तम राहतात. तर हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलावामुळे रात्रीच्या वेळी तु्म्ही स्वत:वर कंट्रोल आणि क्रेविंग्स पासून दूर राहणे मुश्किल होते. मेलाटोनिन हार्मोनमुळे रात्रीच्या वेळेस जेवणाची खुप इच्छा होते.

- Advertisement -

रात्री ब्रश केल्याने वजन कमी होते
रात्रीच्या जेवणानंतर ब्रश केल्यान केवळ दात आणि तोंड स्वच्छ राहत नाही तर वजन ही कमी होते. रात्रीच्या वेळेस ब्रश केल्यास दात आणि हिरड्यांमध्ये अडकलेले अन्नपदार्थांचे कण आणि प्लाक निघून जातात. यामुळे तोंडात संक्रमण होण्याची शक्यता कमी होते. तसेच जेव्हा तुम्ही रात्रीचे जेवण केल्यानंतर ब्रश करता त्यानंतर तुम्हाला काहीच खाण्याची इच्छाही होत नाही. (Weight and brushing connection)

ब्रश केल्यानंतर तोंड स्वच्छ होते. त्यामुळे जे काही खाण्याची इच्छा असेल ती होत नाही. रात्रीच्या वेळी अधिक भूक लागू नये म्हणून ही तुम्ही ब्रश करु शकता. जेव्हा तुम्ही ब्रश करता तेव्हा तुमचा मेंदू शरिराला असे संकेत देतो की, आता जेवण संपलेले आहे. यामुळे काही खाण्याची इच्छा होत नाही. तसेच स्नॅक किंवा क्रेविंग्स ही कमी होते. काही रिपोर्ट्सने असा दावा केला आहे की, दोन मिनिट ब्रश केल्याने वर्षभरात 3500 कॅलरी बर्न होण्यास मदत मिळू शकते.


- Advertisement -

हेही वाचा- एकच Tooth Brush किती वेळ वापरला पाहिजे? वाचा तज्ञ काय म्हणतात

- Advertisment -

Manini