योगासने निरोगी राहण्याचा सर्वात सोपा आणि सर्वोत्तम मार्ग आहे. योगा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यास महत्वाची भूमिका बजावतो. खरंतर योगासने करण्याचे अगणित फायदे आहेत. गेल्या काही वर्षांपासून योगासने करण्याची क्रेझ वाढली आहे. योगा केल्याने तुम्हाला अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. पण, योगा करण्याचा खरा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही तो योग्य वेळी करता. योगा करताना वेळ लक्षात घेतल्यास त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो.
सकाळी योगासने करण्याचे फायदे –
सकाळी लवकर उठून योगासने करणे नक्कीच फायदेशीर मानले गेले आहे. जेव्हा तुम्ही सकाळी योगासने करता तेव्हा तुमचे मन शांत होते. याव्यतिरिक्त तुम्हाला दिवसभर काम करण्यासाठी एनर्जी मिळते. जे लोक दिवसभर कामात व्यस्त असतात त्यांच्यासाठी सकाळी योगासने करणे जास्त फायद्याचे ठरते. अशाने तुम्ही सकाळी लवकर उठून योगासने केल्यास तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेऊ शकता.
संध्याकाळी योगा केल्यास काय फायदा होईल –
जर तुम्हाला सकाळी योगासने करण्यास वेळ मिळत नसेल तर तुम्ही संध्याकाळी योगा करू शकता. संध्याकाळी योगासने केल्याने दिवसभराचा थकवा आणि स्ट्रेस दूर होऊन तुम्हाला ताजेतवाने वाटते. जेव्हा तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक शांत असता, तेव्हा तुम्हाला चांगली झोप लागते. संध्याकाळी योगा करणे नक्कीच फायद्याचे आहे. पण, एक गोष्ट लक्षात घ्या संध्याकाळी योगा करताना कठीण आणि थकवणारे योगासने करू नयेत.
योगा रिकाम्या पोटीच करा –
जेव्हा योगा करायचा असेल तेव्हा अशी वेळ निवडा जेव्हा तुमचे पोट भरलेले नसेल. सकाळी जेव्हा तुम्ही योगासने करता तेव्हा तुमचे पोट भरलेले नसते. पण, जर तुम्ही संध्याकाळी योगा करणार असाल तर खाणे आणि योगासने यात किमान एक ते दोन तासांचे अंतर ठेवण्याच प्रयन्त करा.
योगासने करण्याची सर्वोत्तम वेळ –
तज्ज्ञांच्या मते, योगासने करण्याची उत्तम वेळ म्हणजे सूर्योदय आणि सूर्योदय होण्यापूर्वीची वेळ. जर तुम्ही ब्रम्ह मुहूर्तावर योगासने केलीत तर अधिक फायदे मिळतात. ब्रम्ह मुहूर्त साधारणतः पहाटे 4 वाजल्यापासून सुरु होऊन 6 वाजेपर्यंत मानण्यात येतो. याशिवाय योगा करताना आरामदायक कपडेच परिधान करा. फक्त एक आठवडा योगासने करून सकारात्मक परिणाम मिळवू शकता.
हेही वाचा : पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवणानंतर ‘या’ दोन गोष्टी करा