Sunday, April 21, 2024
घरमानिनीHealthचालण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या

चालण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या

Subscribe

चालणे हा एक उत्तम एरोबिक व्यायाम आहे आणि तुमचा चयापचय सुरू करण्याचा एक चांगला मार्ग आहे. असे असूनही आजकाल बरेच लोक चालणे टाळतात. अगदी कमी अंतराचाही प्रवास करायचा असेल तर वेळ वाचवण्यासाठी आपण दुचाकी किंवा चारचाकीचा वापर करतो. जे चुकीचे आहे. जर्नल मेडिसीन इन सायन्स अँड स्पोर्ट्स अँड एक्सरसाइजनुसार, चालण्याने जुनाट आजार बरे होण्यास मदत होते. तुम्हीही अनेकदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लिफ्ट किंवा वाहनाचा वापर करत असाल तर जाणून घ्या चालण्याचे फायदे. त्याचे सर्व फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच चालण्याचा प्रयत्न कराल.

चालण्याची योग्य पद्धत कोणती? किती वेळ चालावं?

चालणं हृदयासाठी उत्तम व्यायामप्रकार मानला जातो. नियोजनपूर्वक आणि पद्धतशीर सत्रांत चालण्याचा व्यायाम केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. चालल्यानं संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. शिवाय प्रसन्न वाटतं, असं तज्ज्ञ सांगतात.

- Advertisement -

1. चालायला सुरु करण्याआधी सर्वप्रथम पद्धतशीर वेळापत्रक तयार असायला हवं. ठरावीक नियम पाळल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. चालण्याची सुरुवात पंधरा मिनिटांपासून करा. पहिल्या दोन आठवड्यांमध्ये दररोज तीन ते पाच हजार पावलं चाला. यामुळे शक्ती वाढलेली जाणवेल. यानंतर हळूहळू चालण्याचा कालावधी ३० ते ४५ मिनिटांपर्यंत वाढवा. जेणेकरून, दिवसभरात किमान दहा हजार पावलं पूर्ण होतील.

2. तुम्ही किती चालता यापेक्षा तुम्ही कशाप्रकारे चालता हे जास्त महत्त्वाचं असतं. चालताना शरीर आणि मान कायम ताठ असू द्या. नजर दहा ते पंधरा फुटांपर्यत ठेवा. चालताना शरीराचा भार पुढच्या बाजूला न टाकता सरळ चाला. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोट आत खेचून पाऊल टाकण्याची सवय लावा, असा सल्ला व्यायाम प्रशिक्षक देतात.
चालण्याची सवय लागल्यानंतर तुमच्यात झालेले बदल जाणवतील. शारीरिक क्षमतेनुसार प्रत्येक आठवड्यात चालण्याच्या कालावधीत किमान पाच ते दहा मिनिटांनी वाढ करा. गरजेपेक्षा जास्त वेळ चालणं टाळा.

- Advertisement -

3. शरीराला एकदा चालण्याची सवय लागल्यानंतर कमी वेळात जास्तीत जास्त अंतर चालण्याचा सराव करा. यामुळे स्नायूंना आणि हाडांना बळकटी मिळते. शिवाय अतिरिक्त ताण आणि विनाकारण होणाऱ्या दुखापती टाळता येतात.

4. चालण्यासाठी कायम एकच रस्ता निवडल्यानं शरीराला सवय लागते. यासाठी ठरावीक काळानंतर चालण्यासाठी वेगवेगळ्या रस्त्यांची निवड करण्याचा सल्ला दिला जातो. रस्त्यावर चालण्यासोबतच ट्रेडमिल, समुद्रकिनारा, वाळू असणारी ठिकाणं चालण्यासाठी निवडा. शिवाय, मैदानात चालल्याने देखील शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत मिळते.

चालण्याचे फायदे जाणून घ्या :

फुफ्फुसाची क्षमता वाढते
दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात चालणे तुमच्या फुफ्फुसाची क्षमता वाढवू शकते. वास्तविक, जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात ऑक्सिजन वापरता. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची ही देवाणघेवाण आपल्या फुफ्फुसांसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे सिद्ध होते.

हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
शरीराचं वजन घेऊन आपण दिवसभर चालतो. त्यामुळे शरीरातील हाडांची शक्ती वाढते. त्यामुळे हाडं लवकर ठिसूळ होत नाहीत.

स्नायू बळकट होतात.
रोजच्या रोज चालण्याने स्नायू बळकट होतात. विशेषत: पाय, बोटं, कंबर, यामुळे शरीराचं संतुलन चांगलं राहतं. चालण्यामुळे स्नायूंमध्ये लवचिकता निर्माण होते. चालण्यामुळे शरीराचा बाक चांगला राहतो.

तणाव दूर होतो
दररोज चालणे देखील तुमचा खराब मूड सुधारते. अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की शारीरिक हालचाली नैराश्य टाळण्यास मदत करतात. एवढेच नाही तर चालण्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

इन्सुलिनवर नियंत्रण
अनेक अभ्यासाअंती असं लक्षात आलं आहे की चालण्यामुळे साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. त्यामुळे फॅट साचत नाहीत. कारण त्याचा थेट संबंध हृदयरोग, डायबिटिस आणि यकृताच्या विकारांशी असतो. इन्सुलिन आपल्या शरीराला कसा प्रतिसाद देतो हे चालण्यामुळे आणखी सुधारतं.

चालण्यासाठी टिप्स

  • तुम्ही नुकतेच चालायला सुरुवात केली असेल, तर सुरुवातीला फार लांब अंतर चालू नका.
  •  दररोज 10 मिनिटे चालण्याचा प्रयत्न करा. हळूहळू हा कालावधी दररोज 30 मिनिटांपर्यंत वाढवा. त्यानंतर तुम्ही सकाळी 30 मिनिटे आणि संध्याकाळी 30 मिनिटे चालू शकता.
  • चालणे हा एक चांगला शारीरिक व्यायाम आहे आणि उत्कृष्ट आरोग्य लाभ देतो. पण, चालण्याआधी आणि नंतर वॉर्म अप आणि कूल डाउन व्यायाम करा.
- Advertisment -

Manini