Thursday, April 18, 2024
घरमानिनीHealthशरीरासाठी शाकाहार की मांसाहार योग्य?

शरीरासाठी शाकाहार की मांसाहार योग्य?

Subscribe

शरीरासाठी शाकाहार की मांसाहार योग्य यावरून नेहमीच वाद होत असतो. पण खरं तर आपल्या शारिरीक गरजा आणि आपण जेथे राहतो ते भौगोलिक वातावरण यांवरच आहार अवलंबून असतो. यामुळे त्या त्या गरजेनुसार आहार ठरवला जातो. शाकाहारामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. तसेच शाकाहारी अन्न लवकर पचतेही.

तर दुसरीकडे मांसाहार केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. या आहारात प्रथिने आणि व्हिटॅमिन बी भरपूर असते. ज्यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात.यामुळे या दोन्ही आहारांचे वेगवेगळे फायदे आहेत.

- Advertisement -

हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले
तज्ज्ञांच्या मते, शाकाहारी लोकांमध्ये हृदयाशी संबंधित आजार कमी आढळतात. फायबरयुक्त संपूर्ण धान्य आणि फळे आणि भाज्या खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

कर्करोगाचा धोका कमी होतो
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थने केलेल्या अभ्यासातही असे म्हटले आहे की, शाकाहार घेणाऱ्यांना कर्करोगाचा धोका कमी असतो.

- Advertisement -

वजन नियंत्रणात
तसेच शाकाहार घेतल्यास वजन वाढण्याचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

आयुर्मान वाढवते
फळे आणि भाज्यांचा आहारात जितका जास्त समावेश केला जाईल तितके शरीरात कमी विषारी पदार्थ तयार होतील आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल. यामुळे व्यक्ती अधिक काळ जगते.

निरोगी आणि चमकणारी त्वचा
तुम्ही बाजारात अनेक प्रकारचे फ्रूट मास्क पाहिले असतील जे निरोगी आणि चमकदार त्वचा असल्याचा दावा करतात. आहारात यापैकी अधिकचा समावेश केल्यास ही इच्छा पूर्ण होऊ शकते. फळे आणि भाज्यांमध्ये आढळणारे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेला डागरहित आणि चमकदार बनविण्यास मदत करतात.

मांसाहार

प्रोटीन
मांस, मासे आणि अंडी खाल्ल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतात. जरी प्रथिने कडधान्ये आणि संपूर्ण धान्यांमध्ये देखील आढळतात, परंतु ते शरीरासाठी पुरेसे नाहीत.यामुळे मांसाहारातून प्रोटीनची कमतरता पूर्ण करता येते.

शरीर मजबूत होते

यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात आणि शरीर कमकुवत होत नाही.

व्हिटॅमिन बी १२
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता बहुतेक शाकाहारी लोकांमध्ये दिसून येते, ज्याची भरपाई पूरक आहारांद्वारे करावी लागते. जर तुम्ही तुमच्या आहारात लाल मांस, सॅल्मन, ट्यूना, ट्रॉट फिश, अंडी यासारख्या मांसाहारी पदार्थांचा समावेश केला तर व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात आढळते.

ज्या मुलांच्या आहारात मासे आणि मांसाचा समावेश सुरुवातीपासूनच केला जातो, त्यांची मेंदू तीक्ष्ण असतात. सीफूड, सॅल्मन आणि ट्यूनासारखे मासे मेंदूच्या तीक्ष्णतेसाठी ओळखले जातात.

उत्तम मानसिक आरोग्य
काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की मांसाहारातील अमीनो अॅसिड्स व्यक्तीला मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यास मदत करतात.

- Advertisment -

Manini