Wednesday, February 28, 2024
घरमानिनीHealthUric Acid : ही फळ खा अन् यूरिक ॲसिडला कायमच रामराम करा!

Uric Acid : ही फळ खा अन् यूरिक ॲसिडला कायमच रामराम करा!

Subscribe

आपल्या शरीरात यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होतो. मग काही लोकांचे सांधे जड होतात, त्यांचे हात पाय दुखतात तर काही लोकांच्या पायाला सूज येते, त्यांना थकवा येतो किंवा त्यांच्या टाचा दुखतात. तर अशा समस्यांपासून जर तुम्हाला आराम मिळवायचा असेल तर फळं खाणं खूप गरजेचं आहे.

शरीरातील युरिक ऍसिड हे मुख्यतः किडनीच्या मार्फत फिल्टर होऊन मलमूत्रातून बाहेर पडते पण जेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होते तेव्हा युरिक ऍसिड शरीरात छोट्या खड्यांसारखे जमा होते. बोटांना सूज येणे, गाठ झाल्याचे वाटणे, हातापायाच्या बोटांमध्ये सतत काहीतरी टोचतंय असं वाटणे ही सर्व युरिक ऍसिड वाढल्याची लक्षणे आहेत. तुम्हालाही सतत थकवा जाणवत असल्यास युरिक ऍसिडचे प्रमाण वाढणे हे मुख्य कारण असू शकते.

- Advertisement -

युरिक ॲसिड हा एक प्रकारचा पदार्थ आहे जो प्युरिन नावाच्या घटकाच्या अतिसेवनामुळे शरीरात वाढतो. मूत्रपिंडाद्वारे युरिक ॲसिड बाहेर टाकले जाते, परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त युरिक वाढले तर मूत्रपिंडांना ते शरीरातून काढून टाकण्यास त्रास होऊ लागतो.
त्यामुळे सांध्यामध्ये युरिक ॲसिडचे स्फटिक जमा होऊ लागतात. येथे काही फळे आहेत जी युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.

शरीरात यूरिक ॲसिडची वाढ का होते?
जेव्हा आपण प्युरीन असलेले काही पदार्थ खाता तेव्हा शरीरात यूरिक अॅसिडची पातळी सामान्यपेक्षा जास्त असते. प्यूरिनने भरलेले काही खाण्या पिण्याचे पर्याय समाविष्ट आहेत. याशिवाय काही आरोग्यामुळे आणि जीवनशैलीशी संबंधित विकारांमुळे यूरिक ॲसिड शरीरात देखील साचू शकतो, याची काही उदाहरणे अशी आहेत.

- Advertisement -

युरिक ॲसिडचा त्रास असल्यास ‘या’ फळांचे सेवन ठरते फायदेशीर

संत्री
संत्री खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात युरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात होण्यास मदत होते. संत्रामध्ये ‘विटामिन सी’ असते त्यामुळे ते आपल्या किडनीचे आरोग्य सुधारते तसेच यूरिक ॲसिडची पातळी देखील नियंत्रित करते. तसेच संत्री खाल्ल्यामुळे सांधेदुखी पासून देखील आराम मिळतो. सोबतच यूरिक ॲसिड वाढल्यानंतर टाच दुखत असेल तर संत्री खा यामुळे तुमची टाच दुखी देखील कमी होण्यास मदत होईल.

स्ट्रॉबेरी 
स्ट्रॉबेरी यूरिक ॲसिड नियंत्रणात आणण्यासाठी मदत करते. स्ट्रॉबेरीमध्ये देखील विटामिन सी असते ज्यामुळे आपल्याला सांधेदुखी पासून आराम मिळतो. स्ट्रॉबेरीमध्ये फायबर, कॅल्शियम, विटामिन सी, मॅग्नेशियम असे पोषक घटक असतात जे आपलं शरीर निरोगी ठेवतात आणि यूरिक ॲसिड नियंत्रणात आणण्यासाठी मदत करतात. यासाठी तुम्ही स्ट्रॉबेरीचा रस देखील घेऊ शकता.

अननस
अननस हा देखील युरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात करतो. अननसामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते जे फायबर प्युरीन पचवण्यास मदत करते. जर तुम्हाला युरिक ऍसिडचा त्रास होत असेल तर अननसाचे सेवन जरूर करा. त्यामुळे तुमची यूरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात आणण्यास मदत होईल.

या टिप्स देखील मदत करतील

आल्याचा चहा देखील युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यास उपयुक्त ठरतो. खाण्यासाठी आल्याचा तुकडा लहान तुकडे करून पाण्यात उकळून प्यावा. आल्याचा चहा युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यास मदत करतो.

पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन केल्यास युरिक ॲसिड कमी होण्यास ही मदत होते. हे मूत्रपिंडांना शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

व्हिटॅमिन सीच्या सेवनाने युरिक ॲसिड कमी होण्यास फायदा होतो. संत्री आणि लिंबू मध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यांच्या सेवनाने शरीरातील युरिक ॲसिड कमी होण्यास चांगला परिणाम दिसून येतो.

- Advertisment -

Manini