Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealthथंडीतला आहार कसा असावा ?

थंडीतला आहार कसा असावा ?

Subscribe

थंडीचे दिवस म्हंटल की आठवतो तो मस्त गरमागरम चहा, वाफेदार भजी , आणि बरच काही … मात्र , याच थंडीच्या दिवसात सकस आहार करणेही तितकेच महत्वाचं आहे .मग या सकस आहारात कोणकोणत्या गोष्टीच्या समावेश होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्याने तुमचं पोट थंड राहत आणि पोट थंड असल्याने सतत भूक लागते. त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्या शरीराला गरम ठेवणं गरजेचं आहे. 

How to Stay Healthy This Winter - DIP Foods Homemade Croutons

- Advertisement -

 

  • सूप
तज्ज्ञांच्या मते , या दिवसात आपलं शरीर गरम ठेवणं महत्वाचे असून ज्यासाठी भाज्या आणि कडधान्ये, धान्य किंवा द्रव मिश्रणाने बनवलेले सूप उपयोगी ठरलं आहे . या सूपमध्ये तुम्ही तुळस , काली मिरी , दालचिनी रोजच्या जेवणातील काही गरम मसाल्याचाही वापर करू शकता ज्याने तुम्हाला शरीर गरम ठेवण्यास मदत मिळेल. 
  • गरम पेये
थंडीच्या दिवसात चहा कॉफीसारख्या गरम पेयांना नाही म्हणणारे क्वचितच सापडतील . चहा ,कॉफीसोबत काही गरम पेये जसे की दूध , सूप यांचे सेवन केल्याने शरीर गरम रहाते. 
  • तूप
भारतीय जेवणात महत्वाचा मानला जाणारा पदार्थ म्हणजे तूप. तुपामध्ये शरीरात गरमपणा टिकवून ठेवण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे ह्या पदार्थांच्या सेवनाने तुम्ही थंडीपासून तुमचे रक्षण करू शकता.
Don't Let Winters Bring You Down! Here is a List of Healthy Foods for Winters
 
  • तीळ 
मकर संक्रांतीला बनवल्या जाणाऱ्या लाडूमध्ये तिळाचा समावेश असतो . तिळ हे गरम असल्याकारणाने थंडीत शरीर उबदार ठेवण्यास मदत मिळते.
  • गूळ

रोजच्या जेवणात वापरले जाणारे गूळ हे पचनक्रिया सुधारते आणि शरीर गरम ठेवण्यास मदत करते . हिवाळ्यात दररोज जेवणानंतर थोड्या प्रमाणात गुळाचे सेवन करणे फायद्याचे ठरू शकते .

- Advertisement -
  • ड्रायफ्रूट

अनेकदा घराघरात ड्रायफ्रूट जास्त खाऊ नकोस कारण ते गरम आहेत असे ओरडणारे आवाज थंडीत आवर्जून ड्रायफ्रूट खा असे सांगत असतात. कारण हे थंडीत शरीराचे तापमान वाढवन्यात मदत करतात . काही ड्रायफ्रूट्स शरीरात लोहाचे प्रमाण वाढविण्यात मदत करत असतात .


हेही वाचा – हृदय आणि मेंदू निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश 

- Advertisment -

Manini