प्रेगन्सीमध्ये नऊ महिन्यात हार्मोनल बदलांमुळे आणि मुलाच्या विकासामुळे स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. अशा वेळी स्त्रीने योग्य कपड्यांची निवड करणे गरजेचे असते. शरीरात चाललेल्या अंतर्गत बदलामुळे शरीराला आरामदायी ठेवणे गरजेचे असते. महिलांनी चुकीचे कपडे परिधान केल्यास त्यांच्या समस्या अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. जाणून घेऊयात महिलांनी प्रेगन्सीमध्ये कोणते कपडे घालणे टाळावे.
घट्ट जीन्स –
अनेकदा महिला प्रेगन्सीच्या सुरुवातीच्या काळात घट्ट जीन्स घालतात, मात्र, असे कपडे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. खरे पाहता, घट्ट जीन्समुळे शरीरावर दबाव निर्माण होतो. याशिवाय प्रेगन्सीमध्ये सूज येणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, सूज असतानाही तुम्ही अशी घट्ट जीन्स घातल्यास तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते.
घट्ट टॉप –
घट्ट जीन्सप्रमाणे घट्ट, जास्त फिटिंगला बसणारे टॉप देखील प्रेग्नन्सी पिरिएडमध्ये तुम्ही घालणे टाळले पाहिजे. जीन्समुळे जसे प्रेशर येते, तसे टॉपने येत नाही. पण, घट्ट टॉपमुळे त्वचेवरील घर्षण वाढते. परिणामी, पुरळ किंवा त्वचेची जळजळ होऊ शकते.
वायर्ड ब्रा –
प्रेगन्सीमध्ये अनेक स्त्रिया त्यांचे स्तन वरच्या दिशेने ढकलण्यासाठी वायर्ड लायनिंग ब्रा घालतात. मात्र, असे कपडे प्रेग्नसीमध्ये घालणे हानिकारक ठरू शकते. गर्भधारणेदरम्यान, स्तनांचा आकार देखील वाढतो आणि त्यांची संवेदनशीलता देखील वाढते, अशा परिस्थितीत वायर्ड ब्रा घातल्याने जास्त दाब आणि त्वचेवर जळजळ होऊ शकते.
जंपसूट –
प्रेग्नसीमध्ये पोट जड झाल्यामुळे शरीराच्या हालचालींवर जास्त प्रमाणात मर्यादा येऊ लागतात. या काळात उलट्या होणे, लघवी जास्त होणे, पोट खराब होणे यासारख्या समस्या जाणवू लागतात. अशावेळी जर तुम्ही जंपसूट घातलात तर अशा कपड्यानी तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. याशिवाय प्रेगन्सी लपवण्यासाठी अनेक महिला कपड्यांचे बरेच थर घालतात. अशावेळी प्रेग्नेंट महिलांना हालचाली करण्यास अडथळा निर्माण होऊ शकते.
हेही वाचा : महिलांमध्ये का वाढतोय फायब्रोईडचा धोका?