Saturday, June 10, 2023
घर मानिनी Health महिलांनो 'या' हार्मोन्समुळे तुम्ही आहात फिट

महिलांनो ‘या’ हार्मोन्समुळे तुम्ही आहात फिट

Subscribe

आपल्या शरिरात काही प्रकारचे हार्मोन्स असतात जे शरिरात विविध क्रिया पार पाडत असतात. हार्मोन्सच्या कारणास्तवच आपण काही भावनांचा अनुभव करतो. जसे की, आनंद, दु:ख असे काही. हार्मोन्स आपल्या आरोग्यासह शरिराच्या हालचालींमध्ये फार महत्वाची भुमिका बजावतात. एखादी लहानशी दुखापत झाली किंवा डोळ्यांमधून अश्रू येणे यासाठी सुद्धा हार्मोन्स जबाबदार असतात. महिलांनो तुमच्या शरिरात असलेल्या पुढील काही हार्मोन्समुळे तुम्ही फिट आहात. शारिरीक आणि मानसिक आरोग्याला प्रभावित करणारे महत्वपूर्ण हार्मोन्स बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

-एस्ट्रोजन
एस्ट्रोजन महिलांमध्ये सेक्स हार्मोन्स म्हणून ओळखले जातात. तसेच पुरुषांमध्ये सुद्धा हे हार्मोन्स असतात. महिलांमध्ये एस्ट्रोजन ओवरीमध्ये उत्पन्न होतात आणि ओव्यूलेशन, मेंस्ट्रुएशन, ब्रेस्ट डेवलपमेंटमध्ये मदत करतात. पण गरजेपेक्षा अधिक एस्ट्रोजेन निर्माण झाल्यास काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. या व्यतिरिक्त ते वजन वाढणे, तणाव, डोके दुखी, सेक्स ड्राइव्हमध्ये कमतरता, एंग्जाइटीमुळे सुद्धा वाढू शकतात.

- Advertisement -

-इंसुलिन
इंसुलिन पँक्रियास द्वारे प्रोड्युस केला जाणारा हार्मोन आहे. यामुळे काही शारिरीक कार्ये सुद्धा केली जातात. याचे मुख्य काम खाद्य पदार्थांत असलेले ग्लुकोजमधून उर्जा निर्माण करणे. इंसुलिन ब्लड शुगरचा स्तर रेग्युलेट करते.

-प्रोजेस्ट्रोन
प्रोजेस्ट्रोन सुद्धा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टिम संदर्भातीलच आहे. प्रोजेस्ट्रोन मेंस्ट्रुअल सायकल रेग्युरेट करतो. तसेच युट्रसला ही प्रेग्नेंसीसाठी तयार करतो. प्रेग्नेंसीच्या सुरुवातीच्या काळात याची फार महत्वाची भुमिका असते. प्रोजेस्ट्रोनचा घटता स्तर अधिक आणि अनियमित येणाऱ्या पीरियड्सचे कारण ठरु शकते. त्याचसोबत तो फर्टिलिटीला सुद्धा प्रभावित करु शकतो.

- Advertisement -

-कॉर्टिसोल
कॉर्टिसोलला स्टेरॉइड हार्मोन्स असे सुद्धा म्हटले जाते. हा एड्रेनल ग्लँन्ड द्वारे प्रोड्युस केला जातो. कॉर्टिसोल काही रुपात तुम्हाला हेल्दी आणि उत्साहित ठेवू शकतो. कॉर्टिसोल मेटाबॉलिज्म आणि ब्लड प्रेशर रेग्युलेट करतो. त्याचसोबत अँन्टी इन्फ्लेमेंटरी एजेंट प्रमाणे काम करत हेल्थला सपोर्ट करतो.

-ग्रोथ हार्मोन्स
ग्रोथ हार्मोन्स पिट्युटरी ग्लँन्ड्स द्वारे प्रोड्युस केले जाते. नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिननुसार, ग्रोथ हार्मोन्स सेल्स ग्रोथ, सेल्स रिजेनरेशनमध्ये मदत करतो. त्याचसोबत मेटाबॉलिज्म सुद्धा बुस्ट करतो.

-टेस्टोस्टेरॉन
टेस्टोस्टेरॉन शरिरात असलेल्या प्रमुख एंड्रोजनपैकी एक आहे. हा पुरुषांच्या फर्टिलिटी संबंधितच्या हार्मोन्सचा एक प्रकार आहे. त्याचसोबत महिला सुद्धा टेस्टोस्टेरॉन प्रोड्युस करतात. हा हार्मोन सेक्स ड्राइव, फॅट डिस्ट्रिब्युश, स्नायू यांना बळकटी, बोन मास वाढवण्यास मदत करते.


हेही वाचा- Sex and Diabetes- डायबिटीज आणि सेक्सचा आहे थेट संबंध

- Advertisment -

Manini