Saturday, April 13, 2024
घरमानिनीHealthमहिन्यात 15 किलो वजन कमी करायचंय? रामदेव बाबांच्या 'या' खास टिप्स

महिन्यात 15 किलो वजन कमी करायचंय? रामदेव बाबांच्या ‘या’ खास टिप्स

Subscribe

सध्या अनेक लोकं वजन वाढत असल्यामुळे वैतागलेले आहेत. सतत धावपळीचे आयुष्य आणि तणावामुळे लोकांचे वजन वाढणे आता सामान्य झाले आहे वजन कमी करण्यासाठी अनेकजण तासंतास जीममध्ये जाऊन घाम गाळतात. एवढंच नव्हे तर खाण्या-पिण्यावरसुद्धा नको तितकं नियंत्रण ठेवून डायटिंग केलं जातं. मात्र तरी सुद्धा त्यांचे वजन काही कमी होत नाही. पण तुम्ही योग्य डाएट प्लॅन केलात तर तुम्ही एका महिन्यात बरेच वजन कमी करू शकता.

योगगुरू बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार, खाण्यात आणि थोडा लाईफस्टाईलमध्ये बदल करून चांगल वजन कमी करता येतं. रावदेव बाबा यांनी दिलेल्या टिप्सने तुम्ही 30 दिवसांत तब्बल 15 ते 20 किलो वजन कमी करू शकता.

- Advertisement -

दालचिनी टाकून गरम पाणी
जर आपण नियमितपणे गरम पाण्यात मर्यादित प्रमाणात दालचिनी उकळून त्यात 1 चमचा मध मिसळून प्यायलो तर आपले वजन कमी होऊ शकते. तसेच रात्री 1 चमचा त्रिफळा कोमट पाण्यासोबत घेतल्याने वजन नियंत्रणात राहते. हा उपाय बाबा रामदेव सांगतात. दालचिनी फोट साफ ठेवण्यास मदत करण्यासही मदत करतात. कोमट पाणी ब्लोटिंग सारख्या समस्या दूर होतात.

लिंबू पाणी
बाबा रामदेव यांच्या मते, सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी हळूहळू बाहेर पडते आणि वजन कमी होऊ लागते. शरीरातील चरबी जाळण्यासाठी हा एक चांगला आयुर्वेदिक उपचार आहे. हे शरीर पूर्णपणे डिटॉक्स करते. लिंबू पाणी हे अतिशय फायदेशीर आहे.

- Advertisement -

त्रिफळा
त्रिफळा हा आयुर्वेदातील नियमित वापरला जाणारा पदार्थ आहे. त्रिफळाचे पाणी नियमित पिण्यामुळे मेटाबॉलिजम चांगले राहाते आणि यामुळे तुमचे वजन त्वरीत कमी होण्यासाठी याचा फायदा होतो. त्रिफळा पावडर १ चमचा, १ लहान चमचा लिंबाचा रस, १ मोठा चमचा मध आणि १ ग्लास कोमट पाणी घ्यावे. हे सर्व एकत्र करून हळू हळू घोट घेत प्यावे. नियमित त्रिफळाचे पाणी पिण्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.

दुधीचा रस
बाबा रामदेव यांच्या मते, फक्त दुधीचा रस पिल्याने आणि अश्वगंधाची 3-3 पाने सकाळी, संध्याकाळी खाल्याने एका महिन्यात 15 ते 20 किलो वजन कमी होऊ शकते. 3 महिन्यात किमान 40 ते 50 किलो वजन कमी होते.

- Advertisment -

Manini