Wednesday, February 12, 2025
HomeमानिनीRecipeRadish Raita Recipe : झटपट बनवा मुळ्याचे रायते

Radish Raita Recipe : झटपट बनवा मुळ्याचे रायते

Subscribe

मुळ्याची भाजी ऐकताय अनेकजणांची नाक मुरडली जातात. अशावेळी तुम्ही आरोग्यदायी अशा मुळ्यापासून रायता बनवू शकता. चवीलाही उत्तम असणारा रायता पौष्टिक असल्याने थंडीत खाण्यासाठी बेस्ट मानला जातो.

Prepare time: 10 min
Cook: 10 min
Ready in: 15 min

Ingredients

  • मुळा
  • दही - अर्धी वाटी
  • साखर - 1 वाटी
  • हिरव्या मिरच्या - 2
  • कडिपत्याची पाने - 4 ते 5
  • मोहरी, जिरं
  • हिंग
  • मीठ
  • तेल
  • कोथिंबीर

Directions

  1. सर्वात आधी मुळा स्वच्छ धुवून घ्यावा. धुतल्यानंतर त्याची साल काढून किसून घ्यावा.
  2. किसलेला मुळा एका बाऊलमध्ये घ्या, यात फेटलेले दही, चिमूटभर साखर मिक्स करावी.
  3. गॅसवर कढईत तेल गरम करण्यास ठेवावे.
  4. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरं, हिंग, कापलेल्या मिरच्या, कडीपत्ता टाकून फोडणी द्यावी.
  5. तयार फोडणी मुळ्याच्या मिश्रणात घालावी.
  6. मुळ्याच्या रायत्यामध्ये जेवणाआधी मीठ घालावे.
  7. कारण रायत्यामध्ये मीठ घातल्यावर पाणी सुटतं. त्यामुळे सर्व्ह करण्याआधी रायत्यामध्ये मीठ टाकावे.

Manini