Sunday, February 9, 2025
HomeमानिनीRecipeHealthy Dates Shira Recipe : पौष्टिक खजूर शिरा रेसिपी

Healthy Dates Shira Recipe : पौष्टिक खजूर शिरा रेसिपी

Subscribe

शिरा हा तसा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. गोड असणारा हा शिरा नैवेद्य, प्रसादापासून ते अगदी नाश्ता म्हणूनही खाल्ला जातो. याच शिरा रेसिपीला ट्विस्ट देता येऊ शकतो आणि शिरा अधिकच हेल्दीही बनवता येऊ शकतो. याकरताच जाणून घेऊयात पौष्टिक खजूर शिरा रेसिपी.

Prepare time: 10 min
Cook: 20 min
Ready in: 30 min

Ingredients

  • खजूर - 8 ते 9
  • साखर - अर्धी वाटी
  • तूप - 2 ते 3 टेबलस्पून
  • रवा - 1 वाटी
  • बदाम, काजू, बेदाणे - आवश्यकतेनुसार
  • दूध - 1 कप
  • वेलची - 2

Directions

  1. सर्व प्रथम खजूराच्या बिया काढून घ्या व त्याचे बारीक तुकडे करून घ्या .
  2. सर्व ड्रायफ्रुट्स व वेलची बारीक करून घ्या.
  3. एका कढईत तूप घ्या. तूप गरम झाले की त्यावर रवा छान तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.
  4. नंतर त्यात खजूर टाकून छान मऊसर होईपर्यंत शिजवून घ्या.
  5. नंतर साखर व ड्रायफ्रुट्स टाकून छान एकजीव करून घ्या.
  6. नंतर साखर व ड्रायफ्रुट्स टाकून छान एकजीव करून घ्या.
  7. नंतर एका डिश मध्ये काढून ड्रायफ्रुट्स आणि खजूराने सजावट करून सर्व्ह करावे.

Manini