श्रावण महिना म्हणजे शिवाची आराधना पूजा अर्चना करण्याचा योग. म्हणूनच या महिन्यात उपवास केल्याने शिवकृपा होऊन लवकर फळ मिळते असे म्हटले जाते. यामुळे श्रावणात सणांचा राबता तर असतोच त्याशिवाय घरोघरी या महिन्यात उपवास , व्रत वैकल्य केली जातात.यामुळे उपवासदिनी साबुदाना खिचडी, भगरचा भात, शेंगदाण्याची आमटी यासारख्या पदार्थांबरोबरच पौष्टीक लाडू नक्की खावेत. त्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही.
खजुराचे लाडू
साहीत्य- १ वाटी खजूर, चार चमचे तूप,५-६ बदाम, पाव वाटी काजू, पाव वाटी अक्रोड, पाव वाटी शेंगदाणे, पाव वाटी खवलेला नारळ
कृती-सर्वात आधी ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे भाजून घ्यावे. मिक्सरमध्ये खजुर बारीक करुन घ्यावा. नंतर कढईत तूप गरम करून त्यात खजूराचा लगदा आणि मिक्सरमध्ये केलेली ड्रायफ्रूटची पावडर, किसलेला नारळ टाकून परतून घ्यावा.
थंड झाल्यावर त्याचे लाडू बनवा.
राजगिऱ्याचे लाडू
साहीत्य- १ वाटी राजगिरा, एक वाटी गूळ, २ चमचे तूप, पाणी प्रमाणानुसार
कृती- पॅनमध्ये तूप गरम करुन घ्यावे. त्यात राजगिरा भाजून घ्यावा.तर दुसऱ्या भांड्यात गूळाचे एकतारी पाक करावे.त्यात भाजलेला राजगिरा टाकून मिश्रण एकजीव करावे.लाडू वळवावेत.
गूळ शेंगदाणा लाडू
साहित्य- अर्धा किलो शेंगदाणे, अर्धा किलो गूळ, दोन चमचे वेलची पावडर , दोन चमचे जायफळ पावडर .
कृती-सर्वप्रथम कढईत शेंगदाणे टाकून ते मंद आचेवर खमंग भाजून घ्यावे.नंतर गॅस बंद करावा.
शेंगदाणे थंड झाल्यावर साले काढून मिक्सरमधून जाडे भरडे वाटावे, गुळ बारीक ठेचून घ्यावा. नंतर पुन्हा गूळ आणि
शेंगदाणे, वेलची ,जायफळ पावडर मिकसरमध्ये बारीक करून भांड्यात काढून एकजीव करून त्याचे लाडू बांधून घ्यावेत.हवाबंद डब्यात ठेवावेत.
.