Sunday, March 16, 2025
HomeमानिनीRecipeHealthy Ragi Idli : पौष्टिक आणि झटपट होणारी नाचणीची इडली

Healthy Ragi Idli : पौष्टिक आणि झटपट होणारी नाचणीची इडली

Subscribe

इडली हा प्रामुख्याने दक्षिण भारतीय पदार्थ. सर्वसाधारणपणे सर्वच भारतीय घरांमध्ये सकाळी न्याहारीकरता इडली बनवली जाते. याच इडलीला ट्विस्ट देऊन बनवूयात नाचणीची पौष्टिक आणि टेस्टी इडली.

Prepare time: 10 min
Cook: 30 min
Ready in: 40 min

Ingredients

  • तांदळाचे पीठ - 1/2 वाटी
  • नाचणीचे पीठ - 1 वाटी
  • उडीद डाळ पीठ - 1/4 वाटी
  • मीठ - स्वादानुसार
  • बेकिंग सोडा - 1/2 टीस्पून

Directions

  1. सर्वात आधी उडीद डाळ पीठ, नाचणीचे पीठ, तांदळाचे पीठ एका भांड्यात घेऊन त्यात पाणी टाकून मिनिटभरासाठी झाकून ठेवा.
  2. आता यात बेकिंग सोडा टाकून चांगले एकजीव करून घ्या.
  3. आता इडलीपात्र गरम करून त्याला तेल लावून घ्या. आता त्यात तयार मिश्रण टाकून इडल्या नेहमीप्रमाणे वाफवून घ्या.
  4. तयार इडल्या 5 मिनिटांसाठी थंड होऊ द्यात आता चमच्याच्या सहाय्याने या इडल्या काढून घ्या.
  5. हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा सांबारासोबत या इडल्या सर्व्ह करा.

Manini