स्टायलिश,नीटनेटक, टापटिप दिसणं सगळ्यांना आवडतं. त्यात विशेष करुन महिला लूकच्या बाबतीत अधिक अलर्ट असतात.
यामुळे व्यक्तीमत्व खुलवणारे केस अधिक आकर्षक आणि परफेक्ट दिसण्यासाठी अनेकजण हायलाईट म्हणजेच केस कलर करणे पसंत करतात. पण हायलाईट करताना केसांवर जे प्रॉ़डक्ट वापरले जातात त्यात हानिकारक रसायन असतात. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस सोडता नंतर केसांच्या समस्या सुरू होतात.
केस हायलाईट करतेवेळी केसांना ब्लीच केले जाते. नंतर आपल्या आवडत्या रंग केसांना दिला जातो. . काही दिवस बरं वाटतं. पण, जसजसे दिवस निघून जातात, केसांचा रंग नाहीसा होतो आणि जे उरते ते रंगहीन, कोरडे आणि निर्जीव केस. केसांवर झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे केसांचा पोत बिघडतो. केसांची चमक गेलेली असते. केस झाडूसारखे दिसू लागतात.
त्यामुळे तुमच्या लूकवर किंवा केसांवर कोणतीही केमिकल ट्रीटमेंट करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. रासायनिक उत्पादने वापरून केसांना थेट हायलाइट करणे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी योग्य नाही.
साईड इफेक्टस
हायलाइटिंग प्रक्रियेत वापरलेली रसायने केस कमकुवत करू शकतात, ज्यामुळे केस गळतात. सतत केस गळणे यासारख्या समस्यांमुळे टक्कल पडण्याचीही शक्यता असते.
केस कोरडे होणे
केस हायलाइटिंग प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे केस कोरडे होतात, ज्यामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि केस कोरडे आणि निर्जीव दिसतात. त्याच्या उपचारासाठी, केसांचे पोषण करणे आवश्यक आहे, केसांचा कोरडेपणा तेल किंवा सीरम लावून दूर केला जाऊ शकतो.
ऍलर्जी
कधीकधी हायलाइटिंगसाठी वापरल्या जाणार्या पदार्थांमुळे त्वचेवर किंवा टाळूवर ऍलर्जी होऊ शकते. यामुळे तुम्हाला टाळूला खाज येण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
हानिकारक रसायने
काही हायलाइटिंग प्रक्रियेत वापरलेल्या रसायनांमुळे काहींना डोक्याच्या त्वचेवर जखम होऊ शकते. यामुळे जखमेत संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो.