Sunday, February 25, 2024
घरमानिनी'या' देशातही बांधले जात आहे अयोध्येसारखे हिंदू मंदिर

‘या’ देशातही बांधले जात आहे अयोध्येसारखे हिंदू मंदिर

Subscribe

22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येच्या श्रीराम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. या मंदिरातील श्रीरामांच्या मोहक मूर्तीचे तसेच मंदिराच्या भव्य इमारतीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

डिझाइन अतिशय काळजीपूर्वक केले आहे

- Advertisement -

अशातच, यूएईमधील अबू धाबीमध्ये देखील अशाच प्रकारच्या एका हिंदू मंदिराची निर्मिती केली जात आहे. ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मंदिरात सात बुरुज

- Advertisement -

अबू धाबीमधील हे मंदिर पश्चिम आशियातील दगडांनी बनवलेल्या सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. ते तयार करण्यासाठी 700 कोटी रुपये खर्च झाल्याचे म्हटले जात आहे.

तसेच त्याची रचना देखील अतिशय काळजीपूर्वक केली गेली आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी 18 लाख विटा वापरण्यात आल्या असून ते बनवण्यासाठी 3 वर्षे लागली आहेत. तसेच 2 हजार कारागिरांनी हे मंदिर बनवले आहे.

या मंदिराबाबत असं म्हटलं जात आहे की, त्यात देशातील सात अमिरातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सात मिनारांचा समावेश आहे. तसेच हे मंदिर 27 एकरावर बांधण्यात आले आहे.


हेही वाचा :

इंडोनेशियातील 600 वर्ष जुन्या रहस्यमय मंदिराचे विषारी नाग करतो रक्षण

- Advertisment -

Manini