Prepare time: 10 min
Cook: 15 min
Ready in: 30 min
Ingredients
- 1 वाटी चणा डाळ
- 1 वाटी गूळ (चिरून)
- 1ते 2 चमचा वेलदोड्याची पूड
- 1 ते 4 चमचे जायफळ पूड (ऐच्छिक)
- 1 चमचा तूप
- पोळीसाठी
- 1 वाटी गव्हाचे पीठ
- 1 ते 4 वाटी मैदा (ऐच्छिक, पोळी मऊ होण्यासाठी)
- चिमूटभर हळद
- चिमूटभर मीठ
- 2 चमचे तेल
- आवश्यकतेनुसार पाणी
Directions
- चणा डाळ स्वच्छ धुऊन २ कप पाण्यात मध्यम आचेवर शिजवून घ्या.
- डाळ शिजली की पाणी काढून टाका
- शिजलेल्या डाळीमध्ये गूळ घालून मंद आचेवर शिजवा. मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळा.
- मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमध्ये किंवा पुरणयंत्रात बारीक करून घ्या.
- त्यात वेलदोडे पूड व जायफळ पूड घालून मिक्स करा.
- एका परातीत गव्हाचे पीठ, मैदा, हळद, मीठ व तेल घालून मिक्स करा.
- थोडे थोडे पाणी घालून मऊसर पीठ मळा
- झाकून 3० मिनिटे बाजूला ठेवा.
- पीठाच्या लहान लहान गोळा तयार करा.
- प्रत्येक गोळा थोडा लाटून त्यात १ चमचा पुरण भरा आणि कडा बंद करून गोळा तयार करा.
- हलक्या हाताने पोळी लाटून घ्या. तवा गरम करून तूप घालून पोळी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा.
- गरमागरम पुरणपोळी तूपासोबत किंवा दुधासोबत सर्व्ह करा