Prepare time: 10 min
Cook: 30 min
Ready in: 40 min
Ingredients
- चिरलेले ड्रायफ्रूट्स (काजू, बदाम, पिस्ता) - प्रत्येकी 5 ते 6
- खसखस - 2 टीस्पून
- वेलची - 7 ते 8
- दालचिनी
- काळी मिरी - 1 टीस्पून
- म्हशीचे दूध - 1 लीटर
- साखर - दीड वाटी
- गुलाबाच्या पाकळ्या - आवडीनुसार
- केशर धागे - 5 ते 6
Directions
- एका बाउलमध्ये बदाम, काजू, पिस्ता, खसखस, वेलची, दालचिनी आणि काळी मिरी मिसळा.
- हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवा.
- एका पातेल्यात दूध घ्या आणि ते उकळवा. उकळत्या दुधात साखर घाला.
- आता दुधात बारीक केलेली मसाला पावडर मिसळा.
- थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. नंतर ते एका ग्लासमध्ये ओता.
- ड्रायफ्रूट्स आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा. थंडगार सर्व्ह करा.