Prepare time: 15 min
Cook: 3 to 5 hrs
Ready in: 5 hrs
Ingredients
- पेरू
- मिल्क पावडर
- फ्रेश क्रीम
- साखर
- मीठ
Directions
- पेरूचे आइस्क्रिम बनवण्यासाठी सर्वात आधी पेरू स्वच्छ धुवून घ्यावे.
- पेरू धुतल्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत.
- एका पेरूतील गर काढून पेरू गोलाकार आकारात कापून घ्यावा.
- यानंतर मिक्सरच्या भांड्यत मिल्क पावडर, पेरूचे तुकडे, फ्रेश क्रीम, साखर घालून बारीक करून घ्यावे.
- तयार पेस्ट व्यवस्थिक मिक्स करावी.
- त्यानंतर आपण जो गर काढलेला पेरू होता त्यात ही पेस्ट ओतावी.
- आता आइस्क्रिम फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावा.
- जवळपास 5 ते 6 तासानंतर आइस्क्रिम सेट झालेले तुम्हाला दिसेल.
- तयार आइस्क्रिम सर्व्ह करावी.
- तुम्हाला हवे असल्यास आइस्क्रिमवर मीठासोबत चिमूटभर लाल तिखट टाकावे. यामुळे आइस्क्रिन आणखीनच चवदार लागते.