Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीFashionHomemade Herbal Shampoo : घरच्या घरी बनवा हर्बल शॅम्पू

Homemade Herbal Shampoo : घरच्या घरी बनवा हर्बल शॅम्पू

Subscribe

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बदलती लाइफस्टाइल यामुळे विविध आजारांसोबत केसांच्या तक्रारी बऱ्याच जणांना जाणवत आहेत. जसे की, कोंडा, केसगळती, टाळूचे आजार अशा विविध समस्या. यावर उपाय म्हणून महागडे शॅम्पू आणि कंडीशनर, तेल बाजारातून आणले जातात. पण, या गोष्टी केमिकल्सपासून तयार होत असल्याने कधी कधी केसांच्या तक्रारी कमी होण्याऐवजी दुपट्टीने वाढतात. अशा परिस्थितीत तुम्ही केसांसाठी घरच्या घरी हर्बल शॅम्पू बनवून वापरू शकता.

हर्बल शॅम्पूच्या नियमित वापरामुळे केसांच्या समस्या थांबून केस मजबूत, दाट आणि लांब होण्यास मदत होईल. केसांसाठी हर्बल शॅम्पू फायदेशीर आहे. हर्बल शॅम्पूमुळे केसांची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेण्यास मदत होते आणि हा शॅम्पू घरी बनवण्यासाठी जास्त खर्चही येत नाही. जाणून घेऊयात, घरच्या घरी हर्बल शॅम्पू बनवण्याची पद्धती,

नैसर्गिक साहित्याने बनवा शॅम्पू

साहित्य –

  • शिकेकाई
  • जास्वंदाची पाने
  • तुळशीची पाने
  • कोरफड
  • रीठा
  • सुकलेला आवळा

कृती –

  • सर्वप्रथम शिकेकाई, सुकलेला आवळा आणि रीठा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
  • सकाळी एका पातेल्यात रात्रभर भिजत ठेवलेल्या या तिन्ही गोष्टी पाण्यात उकळवून घ्या.
  • काही वेळाने गॅस बंद करावा आणि रीठा सोलून त्याचा फेस काढून घ्यावा.
  • यानंतर सर्व गोष्टी मिक्सरमध्ये बारीक करून घ्याव्यात. यात जास्वंदाची पाने, तुळशीची पाने, कोरफड घेण्यास विसरू नये.
  • सगळ्या गोष्टी बारीक करून झाल्यावर मिश्रणातील पाणी गाळून घ्यावे.
  • तुम्ही हा शॅम्पू केसांच्या विविध तक्रारींवर औषध म्हणून वापरू शकता.

याचप्रमाणे तुम्ही ग्रीन टीपासूनही हर्बल शॅम्पू बनवू शकता…

ग्रीन टी हर्बल शॅम्पू

साहित्य –

  • हिरव्या चहाची पाने
  • पेपरमिंट तेल
  • खोबरेल तेल
  • मध
  • अॅपल सायडर व्हिनेगर

कृती –

  • सर्वात आधी हिरव्या चहाची पाने सुकवून त्याची पावडर बनवून घ्यावी.
  • आता यात 1 चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करावे.
  • यानंतर मिश्रणात पेपरमिंट तेलाचे 1 ते 2 थेंब टाकून मिश्रण मिक्स करून घ्यावे.
  • तयार मिश्रणात प्रत्येकी 1 चमचा खोबरेल तेल आणि मध मिक्स करावे.
  • तुमचा ग्रीन टी हर्बल शॅम्पू तयार झाला आहे.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini