महिलांसाठी मेकअप म्हणजे जिव्हाळ्याचा विषय असतो. आपण जसे कपडे घालतो किंवा ज्या ठिकाणी जात आहोत त्याप्रमाणे मेकअप केला जातो. हल्ली तर महिला मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी सेटिंग स्प्रे वापरला जातो. बाजारात अनेक ब्रॅंडचे मेकअप सेटिंग स्प्रे मिळतात, जे खिशाला कात्री लावणारे असतात. अशावेळी तुम्ही एलोवेरा जेलच्या मदतीने घरच्या घरीच मेकअप सेटिंग स्प्रे बनवू शकता. एलोवेरा जेल त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे एलोवेरा जेलपासून तयार केलेला मेकअप सेटिंग स्प्रे सौंदर्यासाठी फायदेशीर मानला जातो.
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही एलोवेरा जेल, विच हेजेल आणि ग्रीन टी पासून तयार केलेला मेकअप सेटिंग स्प्रे वापरायला हवा.
साहित्य –
- एलोवेरा जेल – 2 चमचे
- ग्रीन टी – 1/4 कप
- विच हेजल – १ चमचा
कृती –
- सर्वात आधी ग्रीन टी बनवून घ्या आणि थंड होऊ द्या.
- ग्रीन टी थंड झाल्यावर एलोवेरा जेल, विच हेजल आणि ग्रीन टी चे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या.
- तुमचे होममेड मेकअप सेटिंग स्प्रे तयार झाला आहे, केवळ वापरण्याआधी बॉटल हलवून घ्यावी.
तुम्हाला त्वचेवर वृद्धत्वाची चिन्हे दिसत असतील तर एलोवेरा जेल, व्हिटॅमिन ई पासून तयार करण्यात आलेले मेकअप सेटिंग स्प्रे वापरायला हवे. या मेकअप सेटिंग स्प्रेमुळे त्वचेा हायड्रेट होते आणि एक नॅचरल ग्लो त्वचेला येतो.
साहित्य –
- एलोवेरा जेल – 2 चमचे
- डिस्टिल वॉटर – 1/4 कप
- व्हिटॅमिन ई – 1 कॅप्सूल
कृती –
- सर्वात आधी स्प्रे बॉटलमध्ये एलोवेरा जेल आणि पाणी मिक्स करून घ्या.
- तयार पाण्यात 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाका आणि पाणी मिक्स करून घ्या.
- तयार मेकअप सेटिंग स्प्रे तुम्ही मेकअप केल्यानंतर वापरू शकता.
तुमची स्किन ड्राय असेल तर एलोवेरा जेल आणि ग्लिसरीनच्या मदतीने मेकअप सेटिंग स्प्रे वापरणे फायद्याचे ठरेल. ग्लिसरीनमुळे त्वचा ड्राय न होता मेकअप बराच काळ राहतो.
साहित्य –
- एलोवेरा जेल – 2 चमचे
- ग्लिसरीन – 1 चमचा
- डिस्टिल वॉटर – 1/4 कप
कृती –
- सर्वात आधी स्प्रे बॉटलमध्ये एलोवेरा जेल, ग्लिसरीन आणि डिस्टिल वॉटर मिक्स करून घ्या.
- तयार स्प्रे तुम्ही वापरू शकता.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde