Monday, January 13, 2025
HomeमानिनीRecipeHot Chocolate Recipe : हॉट चॉकलेट

Hot Chocolate Recipe : हॉट चॉकलेट

Subscribe

थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. या दिवसात काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा नक्कीच होते. अशावेळी तिखट-तेलकट खाण्याऐवजी तुम्ही टेस्टी आणि हेल्दी हॉट चॉकलेट घरातच बनवू शकता. पाहूयात, हॉट चॉकलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती,

Prepare time: 5 min
Cook: 10 min
Ready in: 15 min

Ingredients

  • दूध - 1 ते 2 कप
  • साखर - 2 चमचे
  • कोको पावडर - 2 चमचे
  • कॉर्नफ्लॉवर - 1 चमचा
  • डार्क चॉकलेट - 2 चमचे
  • दालचिनी

Directions

  1. सर्वात आधी थंड दुधात साखर, कोको पावडर आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यावे.
  2. सर्व साहित्य एकत्र करताना दुधात कॉर्नफ्लॉवर आणि कोको पावडरच्या गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  3. यानंतर दालचिनीचा तुकडा टाकून दूध गॅसवर उकळवण्यास ठेवावे.
  4. दुधाला उकळी आल्यावर त्यात डार्क चॉकलेट मिक्स करावे.
  5. यानंतर दुधाला छानसी उकळी आणावी. तुमचे गरमागरम हॉट चॉकलेट तयार झाले आहे.
- Advertisment -

Manini