Thursday, February 22, 2024
घरमानिनीअश्या पद्धतीने हिवाळ्यात वाळवा कपडे

अश्या पद्धतीने हिवाळ्यात वाळवा कपडे

Subscribe

हिवाळ्यात कपडे कसे सुकवायचे हा प्रश्न घराघरातील गृहिणींना पडतोच. थंडीच्या दिवसात आकाशातील धुक्यामुळे योग्य त्या प्रकारे सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे कपडे सुकविण्यास अडचणी निर्माण होतात. अनेक घरात लोक हीटर आणि ड्रायर तासनतास चालू ठेवूनही समस्या सोडवतात. पण हे चुकीचे आहे. त्यामुळे कपड्यांचा दर्जा खालावतो आणि वीज बिलही भरमसाठ येते. अशा परिस्थितीत, आम्ही दिलेल्या ‘या’ टिप्स तुम्ही फॉलो करा आणि कपडे वाळवा.

How to Dry Clothes in the Winter

- Advertisement -

कपडे नीट पिळून घ्या – कपड्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जितके कमी असेल तितक्या लवकर ते सुकतील . त्यामुळे कपडे धुतल्यावर ते नीट पिळून घ्यावेत.

हवेशीर खोलीत कपडे वाळवा – छोट्या खोल्यांमध्ये ओले कपडे लवकर सुकत नाहीत त्यामुळे कपडे सुकविण्यासाठी, हवेशीर खोली निवडा.

- Advertisement -

कपड्यांमध्ये अंतर असु द्या – जर तुम्हाला कपडे लवकर सुकवायचे असतील तर ते पसरवा आणि दोरीवर लटकवा. कपडे एकमेकांवर वाळत घालू नका. असे केल्याने कपडे ओले राहतात आणि एक प्रकारचा दुर्गंध त्यातून निर्माण होतो.

The best way to dry laundry in winter - Consumer NZ

कपडे उलट-सुलट करत राहा – जितके कपडे मोकळ्या हवेच्या संपर्कात येतील तेवढे ते लवकर कोरडे होतील. अशा परिस्थितीत दर 3-4 तासांनी कपडे उलट-सुलट फिरवत राहा, जेणेकरुन त्याच्या सर्व भागांना हवा मिळेल.

हिटरचा वापर करा – थंडीत कपडे सुकविण्यासाठी हिटर असलेल्या खोलीत कपडे वाळत घाला, जेणे करून ते सुकण्यास मदत होईल .

स्टॅण्डचा उपयोग करा – कपडे वाळत घालण्यासाठी स्टॅण्डचा वापर करा. कारण स्टॅन्ड खास कपडे सुकविण्यासाठी बनविला असतो.


हेही वाचा ;https://www.mymahanagar.com/lifestyle/why-do-you-get-angry-when-you-are-hungry/677523/

- Advertisment -

Manini