Prepare time: 20 min
Cook: 10 min
Ready in: 30 min
Ingredients
- पनीर - 300 ग्रॅम
- लसणाच्या पाकळ्या - 7 ते 8
- हिरवी मिरची
- लाल तिखट
- दही - 1 कप
- गरम मसाला
- कसूरी मेथी
- आमचूर पावडर
- तेल
- मीठ
Directions
- फ्रेश पनीर घ्यावा आणि त्याचे काप करुन घ्यावेत.
- यानंतर एका बाउलमध्ये दही, आमचूर पावडर, कसुरी मेथी, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण एकजीव करुन घ्यावे.
- मिश्रण मॅरीग्नेट करण्यासाठी 10 मिनिटे ठेवावे.
- यानंतर पनीरचे तुकडे तयार मिश्रणात टाकून पुन्हा मॅरीनेटेड करण्यास ठेवावे.
- दुसरीकडे पॅनमध्ये तेल गरम करुन घ्या.
- तेल गरम झाले की, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या घाला.
- पॅन झाकून ठेवा आणि गॅसची आच मंद ठेवा, जेणेकरुन तेल मिरची, लसणाचा स्वाद शोषून घेईल.
- काही मिनिटांनंतर पॅनमध्ये सर्व पनीरचे चौकोनी तुकडे टाका.
- पुन्हा झाकण ठेवून शिजू द्या.
- पनीर शिजत आल्यावर चिरलेली कोथिंबीर टाकावी.
- पनीर गोल्डन ब्राऊन झाल्यावर चिली गार्लिक पनीर सर्व्हिंगसाठी तयार झाले आहे.