Prepare time: 15 min
Cook: 15-20 min
Ready in: 30 min
Ingredients
- उडीद डाळ - 2 वाट्या
- दही (गोड) - 5 वाट्या
- साखर -
- आल्याचा छोटा तुकडा
- हिरव्या मिरच्या - 2 ते 3
- कोथिंबीर
- तेल
- मीठ
Directions
- सर्वात आधी वडे करण्यासाठी चार ते पाच तास डाळ भिजत घालावी.
- यानंतर डाळीत पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी.
- आता वाटलेल्या डाळीत चवीपुरते मीठ घालावे.
- यानंतर कढईत तेल तापत ठेवा. दुसरीकडे हाताने छोटे छोटे वडे बनवून घ्या.
- तेल तापल्यावर त्यात वडे तळून घ्यावेत.
- यानंतर वड्याचा एक भाग तळून झाला की, पाण्यात टाकावे. या पद्धतीने सर्व प्रकारचे वडे तयार करून घ्यावेत.
- अशापद्धतीने वडे तयार झाले आहेत
- आता दह्याची तयारी करूया.
- यासाठी पाणी न घालता दही रवीने घुसळून घ्यावे.
- त्यात चवीप्रमाणे साखर, मीठ, आल्याचा तुकडा, मिरच्या वाटून घाला. कोथिंबीरही चिरून मिश्रणात घालावी.
- वडे सर्व्ह करायच्याआधी वडे अर्धा तास दह्यात घाला आणि दही वड्यावर लाल तिखट, मिर पूड, चिंचेची गोडसर चटणी घालावी.