Prepare time: 15 min
Cook: 10 min
Ready in: 20 min
Ingredients
- ब्रेड स्लाइस -
- अंडी - 2
- दूध - पाव वाटी
- बारीक चिरलेला टोमॅटो - 1
- बारीक चिरलेला कांदा - 1
- हिरवी मिरची - 2 ते 3
- लाल तिखट
- मिरी पावडर
- चाट मसाला
- कोथिंबीर
- बटर
- मीठ
Directions
- ब्रेडचे स्लाइस कापून घ्यावेत. स्लाइस असे कापावेत की, त्याचा त्रिकोणी आकार होईल.
- एका बाऊलमध्ये अंडी फेटून घ्यावीत.
- त्यात दूध, लाल तिखट, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ टाकावे.
- यानंतर एका पॅनमध्ये मध्यम आचेवर थोडे बटर टाकावे.
- यानंतर ब्रेड स्लाइस अंड्याच्या मिश्रणात घोळवून गरम तव्यावर ठेवावा.
- दोन्ही बाजूने शिजल्यानंतर सर्व स्लाइस एका प्लेटमध्ये काढून घ्यावेत.
- आता पुन्हा ब्रेड स्लाइस घ्या आणि त्यावर चिरलेला कांदा-टोमॅटो, चाट मसाला शिंपडावा.
- या पद्धतीने सकाळच्या नाश्त्यात तुम्ही झटपट तयार होणारा मसाला फ्रेंच टोस्ट बनवू शकता.