Prepare time: 20 min
Cook: 30 - 40 mins
Ready in: 1 hrs
Ingredients
- चिकन - अर्धा किलो
- दही - 1 कप
- चिरलेला कांदे - 2
- चिरलेला टोमॅटो - 2
- आल-लसूण पेस्ट - 1 चमचा
- हिरवी मिरची - 2 ते 3
- साखर
- लाल तिखट
- हळद
- जिरे पावडर
- गरम मसाला
- कसुरी मेथी
- मीठ
- तूप किंवा तेल
Directions
- पॅनमध्ये तूप गरम करावे. तूप गरम झाले की, चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट टाकून कच्चा वास जाईपर्यत भाजून घ्यावा.
- टोमॅटो, हिरव्या मिरच्या मऊ होईपर्यत शिजवून घ्यावेत.
- यानंतर लाल तिखट, हळद, जिरेपूड, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून 3 ते 4 मिनिटे परतवून घ्यावेत.
- 3 ते 4 मिनिटानंतर चिकनचे तुकडे त्यात टाकावे आणि 15 ते 20 मिनिटानंतर मध्यम आचेवर झाकण ठेवून शिजवून घ्यावे.
- चिकन शिजत आल्यावर त्यात दही, साखर, कसुरी मेथी, गरम मसाला टाकून एकजीव करावे. चिकन तेल सोडायला सुरूवात झाल्यावर चिकन शिजत आले आहे असे समजावे.
- मुघलाई चिकन शिजल्यावर त्यात चिरलेली कोथिंबीर टाकावी.
- अशा पद्धतीने ढाबा स्टाइल मुघलाई चिकन तयार झाले आहे. तुम्ही रोटीसोबत गरमागरम सर्व्ह करू शकता.